ETV Bharat / state

कंटेनरची एसटी बसला धडक; दोन्ही चालक जखमी - जखमी

धडकेत चालकाचा बाजूचा भाग पूर्णतः दबला गेला. अपघातात बसचालक इक्बाल झावरे आणि कंटेनर चालक निसार अहमद खान यांच्या डोक्याला मार लागला आहे.

बस कंटेनर धडक
author img

By

Published : May 21, 2019, 4:50 PM IST

वर्धा - तळेगाव येथून मोर्शीला जाणाऱ्या एसटी बसचा आणि कंटेनरचा देवगाव फाट्याजवळ अपघात झाला आहे. दोन्ही चालक डोक्याला मार लागल्याने जखमी झाले आहेत.

सकाळच्या सुमारास तळेगाव आगाराची बस क्रमांक (MH-४० Y ५२७८) मोर्शीकडे जात होती. आष्टीकडून येणारा कंटेनर क्रमांक (NL- ०१, N-९८०२) तळेगावच्या दिशेने येत होता. दरम्यान, देवगाव फाट्याजवळ भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. यामध्ये बसचालकाने प्रसंगावधान दाखवत स्वत:चे पाय वाचवले. या धडकेत चालकाचा बाजूचा भाग पूर्णतः दबला गेला. अपघातात बसचालक इक्बाल झावरे आणि कंटेनर चालक निसार अहमद खान यांच्या डोक्याला मार लागला आहे.

बस कंटेनर धडक

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक धीरज राजूरकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Intro:mh_war_bus_accident_vis_1_7204321

बसला कंटेनरची धडक, दोन्ही चालक जखमी
- तळेगाव लगतच्या देवगाव फाट्याजवळची घटना

वर्धा - तळेगांव येथून मोर्शीला जाणाऱ्या बसचा आणि कंटेनरचा एकमेकांना पास होतांना अपघात झाला. हा अपघात तळेगांव आष्टी दरम्यान देवगाव फाट्यालागत झाला. यात दोन्ही चालक डोक्याला मार लागल्याने जखमी झाले. घटबास्थळाचा पंचनामा करत तळेगांव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सकाळच्या सुमारास तळेगाव आगाराची बस बस क्रमांक MH-40, Y 5278 मोर्शीकडे जात होती. आष्टीकडून येणार कंटेनर क्रमांक NL- 01, N-9802 तळेगांवच्या दिशेने येत होता. दरम्यान देवगाव फाट्याजवळ भरधाव कंटेनरने बसला धडक दिल्याचा बोलले जात आहे.

बस चालक ईकबाल झावरे याने समय सुचकतेने स्वतःचा बचाव करत पाय वाचवले. यात धडकेत चालकाचे बाजूचा भाग पूर्णतः दबला. यामुळे बस चालकाचे पाय बचावले. यात बस चालक इकबाल झावरे आणि कंटेनर चालक निसार अहमद खान हे दोघेही डोक्याला मार लागल्याने जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पीएसआय धीरज राजूरकर हे चमूसह पोहचून जखमींना रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करत घटनेची नोंद घेतली. पुढील तपास सुरू आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.