ETV Bharat / state

मतकंदन - वर्धा मतदारसंघात भाजपला ऐतिहासिक यश; रामदास तडस दुसऱ्यांदा विजयी

author img

By

Published : May 25, 2019, 8:51 PM IST

Updated : May 25, 2019, 10:46 PM IST

वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे विश्लेषण केले आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी.

संपादीत छायाचित्र

वर्धा - वर्धा मतदारसंघाचा निकाल लागला असून भाजपचे रामदास तडस यांना मतदारांनी दुसऱ्यांदा कौल दिला आहे. विदर्भ केसरी राहिलेले रामदास तडस हे दुसऱ्यांदा निवडून येत राजकारणातील पैलवान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. यंदा भाजपच्या विजयाने इतिहासातील दोन रेकॉर्ड मोडले आहेत. १ लाख ८७ हजार मताधिक्य मिळवत मिळालेला विजय हा मोदी लाटेचा आहेच पण सोबतीला इतरही महत्त्वाची कारणे आहेतच.

वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे विश्लेषण केले आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी.

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्याच मुख्य लढत होती. तसेच राज्यात बहुतेक ठिकाणी तिहेरी लढत निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांच्यामुळेही निवडणुकीला रंगत आली होती. मात्र, आता वर्धेकरांनी रामदास तडस यांना निवडून दिले.

भाजपने यापूर्वी वर्ध्यामध्ये 3 वेळा विजय मिळवला आहे. तर सलग दोनदा निवडून येणारे भाजपचे पहिलेच उमेदवार आहेत. रामदास तडसांच्या पाठीशी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम ताकद होती. तर पंतप्रधान मोदींनी देखील तडस यांच्यासाठी सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. तडस हे विदर्भ केसरी राहिलेले पैलवान आहेत.

जरी मोदींची लाट असली तर रामदास तडस यांची प्रतिमा मागील पाच वर्षातील चांगलीच सुधारली आहे. सहज उपलब्ध होणारा खासदार अशी ओळख त्यांना लोकांशी नाळ जोडून ठेवण्यात कामी आली. जातीय राजकारण तापले असताना त्यांना सर्वच समाजातून भरघोस मते मिळाली. त्यांनी केलेली विकास कामे आणि पाच वर्षात मतदारसंघातील गावा-गावात जाऊन पोहोचत तयार केलेला जनसंपर्क हे सुद्धा त्यांच्या यशाचे गमक आहे.

काँग्रेसचा गड भाजपमय होण्यास खऱ्या अर्थाने २०१४ पासून सुरुवात झाली. या पाच वर्षात भाजपकडे ग्रामपंचयात ते खासदार मोठी ताकद उभी राहिली. भाजपची ताकद वाढत असताना काँग्रेसला धक्के बसत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भक्कम पाठिंबा, भरघोस निधी त्यामुळे तडस यांना लोकांनी स्वीकारले, असे निवडणुकीच्या निकालावरून सध्या तरी दिसत आहे.

भाजपच्या यशाला मुकुट घालणारी सर्वात महत्त्वाची ताकद म्हणजे बूथ लेव्हलवर असलेली कुशल यंत्रणा. यावर भाजपने मागील दोन वर्षांत केलेले प्रचंड काम हे फलश्रुतीतून दिसले आहे. याचा फायदा मतदारांना घरातून काढत भाजपला मतदान करून घेण्यात जास्त परिणामकारक ठरले. त्यामुळे मताधिक्य हे १ लाख ८७ हजारांच्या घरात जाऊन पोहचू शकले. काँग्रेस येथे चांगलीच कमकुवत झाली आहे. भाजप सलग दोनदा निवडून येणारा ही इतिहासातील पहलीच वेळ. मागील 60 वर्षात भाजपकडून काँग्रेसने दोनदा पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विधानसभेत काँग्रेसला लोकसभेच्या निकालाचा फटका बसणार आहे. अनेक वर्षांपासून खिळखिळी झालेली काँग्रेसने संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. काँग्रेसला जुन्या जाणकार लोकांनासुद्धा जवळ करत मार्गदर्शन घेणे आणि नवीन युवा शक्तीला सोबत घेत हाताची ताकद वाढवणे गरजेचे आहे. एकट्याने हात वर करून चालण्यापेक्षा जुन्या आणि नवीन याचे ताळमेळ बसवत हाताला जुन्या मार्गदर्शनाचा आधार जास्त महत्वाचा ठरेल. संघटना मजबूत झाला तर काँग्रेसला काही परिमाण पाडता येईल. अन्यथा एकला चलो रे ही भूमिका कायम राहिल्यास भाजपच्या वाढलेल्या ताकदी समोर काँग्रेस टिकणे सध्यातरी कठीण दिसत आहे.

Intro:वर्धा लोकसभेचा निकाल आलेला आहे. भाजपचे रामदास तडस यांना मतदारांनी दुसऱ्यांदा कौल दिला आहे. विदर्भ केसरी राहिलेले रामदास तडस हे दुसऱ्यानंदा निवडणून येते राजकारणातील पहेलवान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. यंदा भाजपच्या विजयाने इतिहासातील दोन रेकॉर्ड मोडले ते पुढे पाहूया

1लाख 87 हजार मतांचे मताधिक्य मिळवत मिळालेला विजय हा मोदी लाटेचा आहेच पण सोबतीला इतरही महत्वाचे करणे आहेच. तेच काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकास याना पराभव का स्वीकारावा लागला ते पाहू

लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या तसेच महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता राव टोकस या दिवंगत प्रभाताई राव यांच्या कन्या आहे. कॉंग्रेसमध्ये प्रभावी म्हणून प्रभाताईची ओळख होती. जायच्या त्या वर्ध्याच्या खासदार तर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष राहिल्या होत्या. यंदा चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळवण्यासाठी अगोदर पासून प्रयत्न केले. पण विजयी होण्यासाठी लागणारी रणनीती पाहिलपासूनच नव्हती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद नंतर त्यांचा स्थानिक जनतेशी फार काही संपर्क राहिला नाही.
2014 राहुल गांधी यांच्या प्रायमरी उमेदवार निवडीत पराभव नंतर त्याचा संपर्क तुटला. मागील दोन वर्षात पुन्हा जडला. त्यांचावर आरोप झाले त्या गुडगावच्या आहे. पण आरोप नाकारला ओण जनतेने त्यांना नाकारले हे साध्य निकालावरून दिसत आहे. पुढील संपर्क टिकतो लो राहतो हवं येत्या काळात दिसलेच.

काँग्रेस गटबाजीने पूर्णतः खिळखिळी झाली आहे. नव्याने जिल्हाध्यक्ष मिळाले स्वच्छ प्रतिमेचे मनोज चांदूरकर यांनी कलह कमी करत घडी बसवण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्ण यशस्वी झाला नाही. कॉंग्रेसमधे अनेक गट सक्रिय आहे. आपल्या पक्ष्याचा उमेदवार निवडणून आणण्यापेकक्षा आपल्या गटाचा नसल्याने पराभव कसा होईल याचाही विचार जास्त करतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकसभा मतदार संघ हा सहा विधानसभा मिळून तयार होतो. याच नियोजन आणि रणनीती हे तेवाढीच प्रभावी असणे गरजेचे होते. निवडणुकीच्या काळात आजूबाजूला दिसणारा गोतावळा जास्त असला म्हणजे नियोजन समजता येणार नाही. राहुल गांधींचीच सभा यशस्वी होऊन सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला असे म्हणता येणार नाही. यासह जरी इतका जुना राष्ट्रीय पक्ष असतांना संघटन मात्र पूर्णतः मोडल आहे. हे कॉंग्रेसमध्ये नेत्यांना पराभवा नंतर मान्य करतायत.

भाजपचे रामदास तडस हे विजयी होणारे चौथे उमेदवार आहे. तर सलग दोनदा निवडणून येणारे भाजपचे पहिलेच उमेदवार आहे. जरी मोदींची लाट असली तर रामदास तडस यांची प्रतिमा मागील पाच वर्षातील चांगलीच सुधारली आहे. सहज उपलब्ध होणार खासदार स्वभाव त्यांना लोकांशी नाळ जुडून ठेवण्यात कामी आलली. जातीय राजकारण तापले असतांना त्यांना सर्वच समाजातून भरगोस मते मिळाली ते विकास काम आणि पाच वर्षात मतदार संघातील गावा गावात जाऊन पोहोचत तयार केलेला जनसंपर्क हे सुद्धा यशाचे गमक आहे.

महात्मा गांधींच्या नावाने जिल्ह्याला देशभरात ख्याती मिळवली आहे. याच ठिकाणी काँग्रेस अडचणीत आली तेव्हा मदत केली आहे. पण सध्या जिल्ह्यातील जुने कार्यकरत्ये तुटल्याने जिथे काँग्रेस तब्बल 12 वेळा लोकसभा लढली तिथे आज कार्यकर्त्यांची वानवा दिसतोय.

काँग्रेसचा गड भाजपमय होण्याला सुरवात खऱ्या अर्थाने 2014 पासुन झाली. दरम्यानच्या पाच वर्षात भाजपकडे ग्रामपंचयात ते खासदार मोठी ताकद उभी राहिली आहे. भाजपची ताकद वाढत असतांना कॉंग्रेसला धक्के बसत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार याना भकम पाठिंबा. भरघोस निधी विकासाला लोकांनी स्वीरकरले असे निवडणुकीच्या निकालावरून सध्या तरी दिसत आहे.

भाजपचा यशाला यशाच मुकुट घालणारी सर्वात महत्वाची ताकद म्हणजे बूथ लेव्हलवर असलेली कुशल यंत्रणा. यावर भाजपने मागील दोन वर्षात केलेले प्रचंड काम हे फलश्रुतीतून दिसले आहे. याचा फायदा मतदारांना घरातून काढत भाजपला मतदान करून घेण्यात जास्त परिणाम कारक ठरले त्यामुळे मताधिक्य हे 1 लाख 87 हजाराच्या घरात जाऊन पोहचू शकले हे नाकारल्या जाऊ शकत नाही. तेच काँग्रेस इथे चांगलीच कमकुवत झाली आहे.

जे दोन रेकॉर्ड मोडले ते म्हणजे भाजप सलग दोनदा निवडणून येणारा ही इतिहासातील पहलीच वेळ. मागील 60 वर्षात भाजपकडून काँग्रेसने दोनदा पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विधानसभेत काँग्रेसला लोकसभेच्या निकालाचा फटका बसणार आहे. अनेक वर्षांपासून खिळखिळी झालेली काँग्रेस हवं संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. काँग्रेसला जुन्या जाणकार लोकांना सुद्धा जवळ काढत मार्गदर्शन घेणे आणि नवीन युवा शक्तीला सोबग घेत हाताची ताकद वाढवणे गरजेचे आहे. एकट्याने हात वर करून चालण्यापेक्षा जुन्या आणि नवीन याचं ताळमेळ बसवत हाताला जुन्या मार्गदर्शनाचा आधार जास्त महत्वाचा ठरेल. संघटना मजबूत झाले तर काँग्रेसला काही परिमाण पडता येइल. अन्यथा एकला चलो रे .... ही भूमिका कायम राहिल्यास भाजपच्या वाढलेल्या ताकदी समोर काँग्रेस टिकणे सध्यातरी कठीण दिसत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : May 25, 2019, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.