ETV Bharat / state

'प्रहारचे' अनोखे आंदोलन..चिखल हटवण्यासाठी चिखलात झोपले कार्यकर्ते - प्रहार आंदोलन

थोडा पाऊस आल्यास पूर्ण रस्ते चिखलमय होऊन जातात. ही परिस्थिती पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही दुर्लक्ष करण्यात आले.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : Jun 16, 2021, 11:33 AM IST

वर्धा - आर्वी शहरात अनेक दिवसांपासून गटार योजनेचे काम सुरू आहे. यामुळे सध्या रस्त्यांवर चिखल तयार झाला आहे. सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असल्याने 'प्रहार' सोशल फोरमच्या वतीने चिखलात लोळत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. अखेर आश्वासना नंतर हे आंदोलन करण्यात आले.

तीव्र आंदोलनाचा इशारा
शहरातील भूमीगत गटार योजनेचे काम सुरू असताना पावसाळा सुरू झाला. परिणामी पावसाच्या पाण्याने रस्त्याचे हाल झाले आहे. नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या चिखलामुळे अनेकजण पडलेसुद्धा आहे. थोडा पाऊस आल्यास पूर्ण रस्ते चिखलमय होऊन जातात. ही परिस्थिती पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. आंदोलन दरम्यान आर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक मगर यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी काळ्या मातीच्या जागी मुरूम रस्त्यावर टाकून देण्याचे आश्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतरही ही योग्य न्याय न मिळाल्यास अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलनाचा इशारा बाळा जगताप यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.