ETV Bharat / state

जिवंत माणसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा...वर्ध्यात 'प्रहार'चे लक्षवेधी आंदोलन - वर्धा शहर बातमी

वर्धा शहरात रस्ते अपघाता अनेक घटना घडत आहेत. असे असतानाही नगर विकास प्रशासनाला जाग येत नसल्याने आज जिवंत व्यक्तीला तिरडीवर आणण्याची वेळ आली असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी म्हटले आहे.

Prahar Janshakti Party agitation in Wardha city
प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा शहरात आंदोलन
author img

By

Published : Jul 7, 2020, 9:56 PM IST

वर्धा - शहरातील अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. त्यामुळे आज (मंगळवार) प्रहारच्या वतीने वर्धा नगरपालिकेच्या कार्यालयात जिवंत व्यक्तीला तिरडीवर आणून नारेबाजी करण्यात आली. यामध्ये अमृत योजनेतील कामाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच शहरातील खड्डे हे मृत्यूला आमंत्रण देत असल्याने 'मला मारायचे नाही' असे फलक घेऊन नगर परिषद कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.

वर्धा शहरात रस्ते अपघाता अनेक घटना घडत आहेत. असे असतानाही नगर विकास प्रशासनाला जाग येत नसल्याने आज जिवंत व्यक्तीला तिरडीवर आणण्याची वेळ आली असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी म्हटले. यावेळी आंदोलकांकडून कामाचा आणि नगर परिषद प्रशासनाचा निषध नोंदवण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्ष वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - कोविड संकटात 'दाता' आणि 'डाटा' महत्वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अचानक 'तिरडी' घेऊन प्रहारने आंदोलन केल्याने नगर परिषदेत खळबळ उडाली. यावेळी नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निकृष्ठ होत असलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. शहरात अमृत योजनेत पाईपालाईन टाकण्यात आली. या पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. पण पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन सुद्धा ते खड्डे बुजवण्यात आले नाहीत. तसेच शहरातील अनेक भागात अजूनही कामे सुरू आहे. हे खड्डे कुठल्याही पद्धतीने बॅरिकेट्स न करता सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आली नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्डा लक्षात न आल्यास अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता आहे, असे आंदोलकांनी म्हटले.

शहरातील हे जीवघेणे खड्डे लवकरात लवकर बुजवावे. ज्या ठिकाणी खड्डे करून काम सुरू आहे, तिथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. त्या ठिकाणी बॅरिकेट लावावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे.

हेही वाचा - चिंताजनक..! कोरोनामुळे एकट्या मुंबईत चीनपेक्षाही जास्त रुग्ण दगावले

ही अमृत योजना नसून विष कालवणारी योजना...

शहरात अमृत योजनेने लोकांना सुविधा होईल, अशी आशा होती. मागील काळापासून सुरू असलेली योजना आता अमृत योजना नसून विष कालवणारी योजना झाली आहे. यामुळे यावर उपाययोजना केल्या नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यानी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.