ETV Bharat / state

सत्यमेव जयते वॉटर कप: आमदार समीर कुणावर यांनी केलं श्रमदान - wardha

सेलू तालुक्यातील पळसगाव(बाई) या गावाने सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग आहे. यासाठी  करण्यात आलेल्या श्रमदानात ग्रामस्थांनी मोठ्ठा सहभाग दर्शवला होता. महत्वाचे म्हणजे, या श्रमदानात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग दाखवत श्रमदान केले.

सत्यमेव जयते वॉटर कप: आमदार समीर कुणावर यांनी केलं श्रमदान
author img

By

Published : May 11, 2019, 11:27 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पळसगाव(बाई) या गावाने सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग आहे. यासाठी करण्यात आलेल्या श्रमदानात ग्रामस्थांनी मोठ्ठा सहभाग दर्शवला होता. महत्वाचे म्हणजे, या श्रमदानात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग दाखवत श्रमदान केले.

सत्यमेव जयते वॉटर कप: आमदार समीर कुणावर यांनी केलं श्रमदान

पळसगाव(बाई) ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी सकाळच्या सुमारास महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 800 मिटरच्या बांधी बांधल्या गेली. या बांधीमुळे तब्बल 40 लक्ष मीटरचा पाणी साठा होणार आहे. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्रमदानाला सुरुवात करण्यात आली होती.

पळसगावत 700 श्रमदात्यानी केले श्रमदान -
या महाश्रमदानात गावात आलेल्या मान्यवराची नोंद घेतली जाते. आज झालेल्या या महाश्रमदनाला पळसगावात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग घेत श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वय चंद्रशेखर डोईफोडे, आकाश बिसंदरे, तांत्रिक साहाय्य, ज्योसना नारनवरे यांनी आमदार कुणावर यांना कामाची माहिती दिली. तसेच महाश्रमदनाला बाहेर गावावरून डॉक्टर, वकील, शाळकरी, केसरीमल नगर विद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच गावकरी मिळून 700 लोकांनी सुध्दा महाश्रमदानात सहभाग घेतला होता.

गाव पाणीदार करण्यासाठी मिळाले आर्थिक मदत -
गावातील प्रणय दिलीपराव बोरकुटे यांच्या माध्यमातून हमदुले व पीको इंडस्ट्रीज पुणेच्या वतीने 70 हजार रुपये शेततळ्यासाठी देणगी म्हणून देण्यात आली. त्याचेसुध्दा भूमिपूजन डॉक्टर मधुकर कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.

दिव्यांग फैजलने केले श्रमदान...
दिव्यांग फैझल शेख नामक युवकाने सुध्दा श्रमदानात भाग घेत इतरांना प्रेरणा देण्याचे काम केले. श्रमदानाला लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी श्रमाचे मोल नसल्याचे सांगत त्याला कौतुक म्हणून मिळणारे पैसे त्याने पाणी फाऊंडेशनला दिले.

Intro:R_MH_11_MAY_WARDHA_MAHASHRAMDAN_VIS_1

गाव पाणीदार करण्यासाठी महाश्रमदानातून दिला जातोय लढा,

- एका हाताने दिव्यांग असणाऱ्या फैझल शेखने केले श्रमदान

- दुष्काळाच्या लढ्यात ग्रामस्थांना ऊर्जा देण्यासाठी पोहचहले आमदार कुणावार

वर्ध्यातील सेलू तालुक्याचा सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग आहे. याच तालुक्यातील पळसगाव(बाई) ग्रामपंचायत शनिवारी सकाळच्या सुमारास महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत 800 मिटरच्या बांधी बांधल्या गेली. याबांधीमुळे तब्बल 40 लक्ष मीटरचा पाणी साठा होणार आहे.

यावेळी पाण्याचा दुष्काळ असल्याने या लढा देण्याचे गाव गावपातळीवर केला जात आहे. याच गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाची अनेक जण या महाश्रमदानात श्रमाचे दान घाम गाळून करता. तापमानाचा पार सकाळपासूनच जाणवत असता सकाळी 6 ते सात वाजताच्या सुमारास या महाश्रमदनाला सुरवात केली जाते.

श्रमदानाला अतिथी देवो भव संकल्पना राबवत करतात स्वागत...
श्रमदनाला येताना बाहेर गावची मंडळी जेव्हा गावात त्यांचा मदतीसाठी धावून येतात. तेव्हा त्यांना आल्यावर पाहुणे म्हणून त्यांच स्वागत लेझीमच्या साह्याने लाहान मुली करता. त्यांनतर अक्षवन करत अतिथी देवो भव असा मान गावात आलेल्या श्रमदात्याना दिला जातो.

पळसगावत 700 श्रमदात्यानी केले श्रमदान, आमदार कुणावर यांनीही केले श्रमदान

या महाश्रमदानात गावात आलेल्या मान्यवरणाची नोंद घेतली जाते. आज झालेल्या या महाश्रमदनाला पळसगावात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग घेत श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वय चंद्रशेखर डोईफोडे, आकाश बिसंदरे, तांत्रिक साहाय्य ,ज्योसना नारनवरे यांनी आमदार कुणावर यांना माहिती दिली. तसेच महाश्रमदनाला बाहेर गावावरून डॉक्टर, वकील शाळकरी केसरीमल नगर विद्यालयाचे प्राध्यापक आमी विध्यार्थी तसेच गावकरी मिळून 700 लोकांनी सुध्दा महाश्रमदानात सहभाग घेतला.

गाव पाणीदार करण्यासाठी मिळाले आर्थिक मदत
यावेळी आचारसंहिता असल्याने मशीनकाम झाले नाही. त्यामुळे काही कामांकरिता आर्थिक साह्य देत काम पूर्णत्वास करनार असल्याचे सांगितले. गावातील प्रणय दिलीपराव बोरकुटे यांच्या माध्यमातून हमदुले व पीको इंडस्ट्रीज पुणेच्या वतीने 70हजार रुपये 35×50 चे शेततळे करण्यासाठी देणगी देण्यात आली. त्याचे सुध्दा भूमिपूजन डॉक्टर मधुकर कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.

दिव्यांग फैजलने केले श्रमदान...
या श्रमदाना करीत गावकारांचा उस्फुर्त प्रतिसाद होताच. याच गावातील दिव्यांग फैझल शेख नामक युवकाने सुध्दा श्रमदानात भाग घेत इतरांना प्रेरणा देण्याचे काम केले. श्रमदानाला लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी श्रमाचे मोल नसल्याचे सांगत त्याचे कौतुक म्हणून मिळणारे पैसे त्यांनी पाणी फाऊंडेशनला देत गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानासोबत मिळालेले पैसे दान करत प्रेरणाच दिली.
Body:पराग ढोबळे,वर्धाConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.