ETV Bharat / state

वर्ध्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस कडक निर्बंध - वर्धा लेटेस्ट न्यूज

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे सकाळी 7 वाजल्यापासून 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

वर्ध्यात कडक निर्बंध लागू
वर्ध्यात कडक निर्बंध लागू
author img

By

Published : May 6, 2021, 6:43 PM IST

वर्धा - लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध 8 मे ला लागू होणार असून 13 पर्यंत कडक निर्बंध असणार आहे. याकाळात वैद्यकीय सेवाच सुरु राहणार आहे. यासोबत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस कडक निर्बंध
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे सकाळी 7 वाजल्यापासून 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. या काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने ग्राहकांसाठी बंद असणार आहे. मात्र, सकाळी 7 ते 11 पर्यंत घरपोच पार्सल सेवा सुरु राहणार आहे. किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी दुकाने तसेच खाद्यपदार्थाची सर्व दुकाने बंद राहणार आहे. या काळात हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत तर दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

हेही वाचा-'निरी'च्या संशोधकांना यश; ड्राय स्वॅबच्या माध्यमातून आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट अवघ्या तीन तासात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.