वर्धा : शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अशोक शिंदेना मनसेचा जाहीर पाठिंबा - Ashok Shinde hinganghat latest news
युतीत जागा न मिळाल्याने बंडखोरी करत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. शिंदेना मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने हिंगणघाट मतदारसंघातील राजकीय आखाड्यात वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे. बंडखोरीतून तयार झालेली ही युती मात्र राजकीय दृष्ट्या निवडणुकीत रंगत वाढवणारी ठरणार आहे.
वर्धा - भाजपसाठी सोपी समजली जाणारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता मतदानाची वेळ जवळ येता-येता कठीण होत चालली आहे. युतीत जागा न मिळाल्याने बंडखोरी करत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मनसेकडून जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे अर्ज छाननीत नामांकन रद्द झाले होते. आज पत्रकार परिषद घेऊन शिंदेना मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने हिंगणघाट मतदारसंघातील राजकीय आखाड्यात वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - मोठ्या लोकांवर असलेले 81 हजार कोटींचे कर्ज सरकार भरणार - शरद पवार
पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिल्याचे अतुल वांदिले यांनी सांगितले आहे. बंडखोरीतून तयार झालेली ही युती मात्र राजकीय दृष्ट्या निवडणुकीत रंगत वाढवणारी ठरणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणे जोडली जात आहेत. यात मनसेच्या पाठिंब्याने अशोक शिंदे यांची बाजू भक्कम झाली आहे. याचा फायदा त्यांना होईल आणि राजकीय रणनितीतून निवडणूक जिंकण्याचे ध्येय साध्य करणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मात्र, मतदार हा बदल स्वीकारतील की नाही हे मतांच्या आकडेवारीतुनच समोर येईल. दरम्यान, राष्ट्रवादीतील नाराज झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी कुणाला पाठिंबा जाहीर करणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
mh_war_manse_pathimba_jahir_vis_byte_mhc10016
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अशोक शिंदेना मनसेचा जाहीर पाठिंबा
- अतुल वांदीले मनसेची उमेदवारी त्रुटीमुळे झाली होती रद्द
- संयुक्त पत्रकार परिषद घेत पाठिंबा जाहीर
- हिंगणघाट मतदार संघात आता होणार तिरंगी लढत होण्याची शक्यता
वर्धा / हिंगणघाट - भाजपासाठी सोपी समजली जाणारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता मतदानाची वेळ जवळ येता येता कठीण होत चालली आहे. यात युतीत जागा न मिळाल्याने बंडखोरी करत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली. मनसेतर्फे मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले अर्ज छानीत शपथपत्र नोटरी नसल्याने नामांक रद्द झाले होते. आज पत्रकार परिषद घेऊन मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने हिंगणघाट मतदार संघातील राजकीय आखाड्यात वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे.
विधानसभेचे राजकीय आखाड्यात केव्हा कोणाचे पारडे जड होईल हे सांगता येत नाही. हा आखाड्यात पहेलवानाला केव्हा चितपट होईल हे ही सांगता येत नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष यांचा अर्ज नोटरी नसल्याने रद्द होणे जेवढे आश्चर्य कारक होते. तेवढेच आश्चर्य पाठिंबा जाहीर केल्याने होत आहे. अपक्ष असल्याने पाठिंबा पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिला असे अतुल वांदिलें सांगत आहे. असे असले तरी राजकारणात दिसते तसे नसते अशी चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळें ही बंडखोरीतून तयार झालेली युती मात्र राजकीय दृष्ट्या निवडणूकित रंगत वाढवणारी असणार आहे.
जशी जशी मतदानाची तारीख जवळ येते आहे तशी तशी अनेक राजकीय समीकरणे जोडली जात आहे. यात मनसेच्या पाठिंब्याने अशोक शिंदे यांची बाजू भक्कम झाली याचा फायदा होईल आणि राजकीय रणनीतीतून निवडणूक जिंकण्याचा ध्येय असणार असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले. मतदार मात्र ही भूमिका स्वीकारते का? हे मतमोजणीतील आकडेवारीतून दिसून पडलेच. तसेच राष्ट्रवादीचे नाराज झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी कोणाला पाठिंबा जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Body:चेतन वाघमारे, हिंगणघाट मतदारसंघ, वर्धा.Conclusion: