ETV Bharat / state

24 तास ऑक्सिजन देणारे पिंपळकुळातील झाडे लावा; मारुती चितमपल्ली यांचे आवाहन - मारुती चितमपल्ली यांचे नागरिकांना झाडे लावण्याचे आवाहन

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील पर्यावरण क्लबच्‍या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमात मारुती चितमपल्ली यांनी वडाच्‍या झाडावर कलम बांधण्याचे प्रात्‍याक्षिक करून दाखवले. मूळ झाडाचे वय कलम केल्यानंतरच्या झाडाला प्राप्त होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वड, पिंपळ, उंबर ही झाडे मोठया प्रमाणात लावावी, असा सल्‍लाही त्यांनी दिला.

tree
प्रात्‍याक्षिक करताना मारुती चितमपल्ली
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:35 PM IST

वर्धा - पर्यावरण तज्ज्ञ मारु‍ती चितमपल्‍ली यांनी पिंपळकुळातील झाडाची गुटी कलम बांधण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. हा कार्यक्रम वर्ध्याच्या निवेदिता निलयम केंद्रात पार पडला. हे प्रशिक्षण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आले. या उपक्रमात वन विभागाचे कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पिंपळ कुळातील झाड लावावे, असे आवाहन मारुती चितमपल्ली यांनी केले.

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील पर्यावरण क्लबच्‍या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमात चितमपल्‍ली यांनी वडाच्‍या झाडावर कलम बांधण्याचे प्रात्‍याक्षिक करून दाखवले. कलम बांधणे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. यावेळी बांधणी करताना फक्त चांगली फांदी निवड करणे गरजेचे आहे.

यावेळी ते म्हणाले, की मूळ झाडाचे वय कलम केल्यानंतरच्या झाडाला प्राप्त होते. यावेळी त्‍यांनी वड, पिंपळ, उंबर ही झाडे मोठया प्रमाणात लावावी, असा सल्‍ला दिला. या कुळातील झाडांचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात, ही झाडे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे आहेत. यामुळे याचा फायदा पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात होतो. यासह ही झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात यश आले तर याचा फायदा म्हणजे वानरांचा त्रास कमी होण्यासाठी होऊ शकतो. ही वानरं या झाडांची फळे खाऊन जगतात. यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकेल. पिकांचे होणारे नुकसान सुद्धा कमी होऊ शकेल.

प्रदूषण कमी होण्यास मदत करते निवडुंगाचे झाड....

आज मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण हे रस्त्यावरील धावणाऱ्या वाहनांमुळे होत आहे. हे प्रदूषण शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी सौंदर्यीकरणासाठी सोडलेल्या जागी निवडूंग (कॅक्‍ट्स) प्रकारातील झाडे लावली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या झाडामुळे कार्बनडाय ऑक्साइडचे तिथेच शोषण होण्यास मदत होईल. यामुळे तो कार्बन वातावरण दूषित होण्यास मदत करते. दिसायला काटेरी असलेले हे झाड औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ओळखले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी विश्‍वविद्यालयाचे प्र-कुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट, निवेदिता निलयमचे किशोर गावंडे, प्रकाश ढोबळे, सामाजिक वनीकरण विभागाचे आरएफओ साकेत शेंडे, वनरक्षक पराते, वर्धा जिल्‍हयाचे वन्‍यजीव संरक्षक कौशल मिश्रा, हिंदी विश्व विद्यापीठाचे पर्यावरण क्‍लबचे संयोजक राजेश लेहकपुरे, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, मंजुषा रागीट, राजदीप राठोड, राहुल तेलरांधे, अविनाश भोळे, सुरभी विप्लव यांची उपस्थिती होती.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.