ETV Bharat / state

पालकमंत्री बावनकुळेंचा जनता दरबार; 'चंद्रशेखरां'नी अधिकाऱ्यांच्या तोंडाचे पळवले पाणी

बावणकुळे यांनी संबंधित विभागाला 15 दिवसाच्या आत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काही कारणास्तव प्रश्न न सुटल्यास ते सुध्दा संबधित तक्रारकर्त्यास सांगा, एकच तक्रार पुन्हा परत येऊ नये, आल्यास तर त्याचे परिणाम आणि उत्तरे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला द्यावे लागतील, असे त्यांनी संबधिताना खडसावले. यामुळे प्रत्येक निवेदनावर शेरा देत प्रश्न निकाली निघतील, असा विश्वास तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना वाटू लागले आहे.

author img

By

Published : Jul 26, 2019, 5:53 AM IST

वर्धा - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर हे मागील साडेचार वर्षे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नुकताच वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर बावणकुळे यांनी गुरुवारी जनता दरबार भरवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी एकाच दिवशी 600 लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर प्रश्न तात्काळ निकाली काढा अन्यथा उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळवले.

पालकमंत्री बावनकुळेंचा जनता दरबार....

सामान्य नागरिकांना स्वतःचे प्रश्न हे सहसा थेट मंत्र्यांपुढे मांडण्याची संधी मिळत नाही. पण चंद्रशेखर बावणकुळे हे पालकमंत्री होताच त्यांनी नागरिकांची गऱ्हाणी थेट त्यांच्याकडून ऐकून घेतली. यात अनेक धक्कादायक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. सर्व सामान्य माणसाला कशाप्रकारे शासकीय यंत्रणेत इथून तिथे, आज या उद्या या असे उत्तर मिळतात हे तक्रारी ऐकून त्यांना कळले.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर -
बावणकुळे यांनी संबंधित विभागाला 15 दिवसाच्या आत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काही कारणास्तव प्रश्न न सुटल्यास ते सुध्दा संबधित तक्रारकर्त्यास सांगा, एकच तक्रार पुन्हा परत येऊ नये, आल्यास तर त्याचे परिणाम आणि उत्तरे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला द्यावे लागतील, असे त्यांनी संबधिताना खडसावले. यामुळे प्रत्येक निवेदनावर शेरा देत प्रश्न निकाली निघतील असा विश्वास तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना वाटू लागले आहे.

सर्वसामान्य नागरिकाचे काय होते प्रश्न -
यावेळी कर्जमाफी झाली नाही, कुणाला कृषी पंप, वीज जोडणी मिळाली नाही, फेरफारसाठी 6 महिने अर्ज देऊनही फेरफार झाले नाही, वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर झाले नाही, दारू बंदी, बोगस बियाणे, नादुरुस्त दर्जाहीन रस्ते, बांधकाम कामगार बोगस नोंदणी अशा अनेक तक्रारींचा पाऊस आज विकास भवन मध्ये जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाला.

तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि विकास योजनांची माहिती देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी गावात शिबीर आयोजित करावे. अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटी नागरिकाचे प्रश्न सोडवावे. अन्नधान्य, गॅस , आवास, वीज , ग्रामीण व नझुल क्षेत्रातील पट्टे वाटप, हे प्रश्न तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने मार्गी लावाव्यात अश्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिल्या आहेत. त्यांनी यावेळी अनेक अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र विकास भवन सभागृहात पाहायला मिळाले.

दारूबंदी विषयासंबंधी सुध्दा अनेक प्रश्न आल्याने, त्यावर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि दारू उत्पादन शुक्ल विभागाचे पोलीस अधीक्षक सुभाष बोडखे यांनी सोबत बसून नियोजन करावे, अश्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या आहेत.

Intro:पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराने सर्वसामान्य नागरिकांनी मिळाली 'उर्जा'

वर्धा महात्मा गांधींचा पावन स्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. साडेचार वर्ष राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पालकमंत्री राहिले. विकासाला भरपूर निधी मिळाला. अनके महत्वाचे विकास कामे मार्गीसुद्धा लागले. नुकतेच पालकमंत्री म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी पदभार स्वीकारला. आज पहिला जनता दरबार त्यांच्या घेण्यात आला. यावेळी तात्काळ काहींना प्रश्नाची उत्तर मिळाले. तर जवळपास 600 लोकांचे गऱ्हाणे एकाचवेळी एकूण घेणारे जिल्ह्याच्या इतिहासात पहिलेच पालकमंत्री ठरले आणि लोकांचे प्रश्न असेही सुटलीत अशी उर्जा यामध्यातून ते देऊन गेले.

सामान्य नागरिकांना स्वताचे प्रश्न हे सहसा थेट मंत्र्यांनपुढे मांडण्याची संधी मिळत नाही. पण चंद्रशेखर बावणकुळे हे पालकमंत्री होताच नागरिकांची गऱ्हाणी थेट त्यांच्याकडून एकूण घेतली. यावेळी मात्र अनेक धक्कादायक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्यात. सर्व सामान्य माणसाला काशाप्रकरे शासकीय यंत्रणेत इथून तिथे, आज या उद्या या असे उत्तर मिळतात हे तक्रारी एकूण कळले. मात्र बावणकुळे यांनी संबंधित विभागाला 15 दिवसाच्या आत प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्यात. तसेच काही कारणास्तव प्रश्न न सुटल्यास ते सुधा संबधित तक्रारकर्त्यास सांगा. एकच तक्रार पुन्हा परत येऊ नये, आल्यास तर त्याचे परिणाम आणि उत्तरे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला द्यावे लागतील असे सांगितले. यामुळे प्रत्येक निवेदनावर शेरा देत प्रश्न निकाली निघतील असा विश्वास तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना वाटू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवणारे कोणीतरी आले अशी एक ऊर्जा लोकांना मिळाली.

सर्वसामान्य नागरिकाचे काय प्रश्न होते...........

यावेली कर्जमाफी झाली नाही, कुणाला कृषी पंप वीज जोडणी मिळाली नाही, फेरफारसाठी 6 महिने अर्ज देऊनही फेरफार झाले नाही, वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर झाले नाही, दारू बंदी, बोगस बियाणे, नादुरुस्त दर्जाहीन रस्ते, बांधकाम कामगार बोगस नोंदणी अशा अनेक तक्रारींचा पाऊस आज विकास भवन मध्ये जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाला.

तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि विकास योजनांची माहिती देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी गावात शिबीर आयोजित करावे. अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटी नागरिकाचे प्रश्न सोडवावे. अन्नधान्य, गॅस , आवास, वीज , ग्रामीण व नझुल क्षेत्रातील पट्टे वाटप, हे प्रश्न तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने मार्गी लावाव्यात अश्या सूचना पालाक्मात्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिल्यात, यावेळी अनेक अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र विकास भवन सभागृहात पाहायला मिळाले.

यावेळी दारूबंदी विषयासंबंधी सुधा अनेक प्रश्न आल्याने त्यावर पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली आणि दारू उत्पादन शुक्ल विभागाचे पोलीस अधीक्षक सुभाष बोडखे यांनी सोबत बसून नियोजन करावे अश्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.