ETV Bharat / state

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले, आजीसोबत फिरायला गेलेल्या बालकाचा मृत्यू

गावातील नागरिकांचा असंतोष पाहता दंगल नियंत्रण पथकालादेखील प्राचारण करण्यात आले आहे.

author img

By

Published : Apr 17, 2019, 1:21 PM IST

मृत बालक

वर्धा - अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे हकनाक बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील वणी येथे घडली. ट्रकच्या धडकेत सोमवारी रात्री सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोहम दूधपोहे असे मृत बालकाचे नाव आहे. त्याची आजी सिंधू दूधपोहे यांचा थोडक्यात जीव वाचला आहे.

अपघातानंतरचे दृश्य

सोहम दूधपोहे हा मूळचा कोसूरला येथील रहिवासी आहे. आजीसोबत लहान वाणी येथे नरेश भडंगे यांच्याकडे तो सुट्टीसाठी आला होता. जेवण झाल्यावर रस्त्याच्याकडेला आजीसोबत तो पायी फेरफटका मारत होता. याच वेळी ट्रक ( महा २९ टी १०५९) हा बोरगाव घाटातून रेती भरून वर्ध्याला वणीमार्गे जात होता. वणी येथील गावात असलेल्या गतिरोधक वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोहमला भरधाव ट्रकने चिरडले. यात सोहमचा जागीच मृत्यू झाला झाला. त्याची आजी सिंधू दूधपोहे यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. संबंधितांनी आर्थिक मदत केल्याने सोहमचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

गावात पोलीस आणि दंगलनियंत्रण पथक दाखल-
हिंगणघाट पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ भीमराव टेळे यांच्यासह हिंगणघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावातील नागरिकांचा असंतोष पाहता दंगल नियंत्रण पथकालादेखील प्राचारण करण्यात आले आहे. याचबरोबर समुद्रपूरचे पोलीस प्रवीण मुंडे, वडणेरचे पोलीस आशिष गजभिये, हिंगणघाटचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव, जोसना गिरी यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल झाले.

अवैध रेती वाहतुकीचा 'बळी' ठरला 'सोहम' -
हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव बोरगाव, सोनेगाव(धोटे), बीड नगाजी, पारडी हे घाट आहेत. यातील घाटांवर अनधिकृतरीत्या बोट आणि जेसीबीच्यासाह्याने वाळूचा उपसा केला जात आहे. मात्र यावर महसूल विभागाची मेहरेनजर असल्याने रात्री चोरून रेती वाहतूक करण्यात येते. त्याचाच सोहम हा बळी ठरला आहे.

Intro:अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने बालकास चिरडले, सहा वर्षीय बालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

हिंगणघाट तालुक्यातील वणी येथे काल रात्री अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सहा वर्षाचा मुलाचा जागीच मृत्यू. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. सोहम दुधपोहे अस मृतक बालकाचे नाव आहे. अजिसोबत फेरफटका मरत असता रस्त्याच्या कडेने जाणार्या भरधाव टिप्पर ने धडक दिली.

सोहम दुधपोहे हा मूळचा कोसुरला येथील रहवासी आहे. आजी सिंधू सोबत लाहान वाणी येथे मोठे बाबा नरेश भडंगे यांच्याकडे पाहूणा म्हणून आला होता. काल रात्री जेवण झाल्यावर रस्त्याच्या कडेला पायदळ फेरफटका मारत होता. याच वेळी टिप्पर क्रमांक महा २९ टी १०५९ हा बोरगाव घाटातून रेती भरून वर्धेला वणी मार्गे निघाला. वणी येथील गावात असलेल्या गतिरोधकाला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला आपल्या आजीच्या हातात हात टाकून असलेला सोहमला भरधाव टिप्पर ने चिरडले. यात त्याचा जागीच दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू झाला सिंधू दुधपोहे थोडक्यात बचावल्या.

हिंगणघाट पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ भीमराव टेळे सह हिंगणघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावातील नागरिकांचा असंतोष पाहता दंगल नियंत्रण पथकाचे देखील प्राचारण करण्यात आले. याच बरोबर समुद्रपूर चे ठाणेदार प्रवीण मुंडे, वडणेरचे ठाणेदार आशिष गजभिये, हिंगणघाट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, जोसना गिरी सह पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून गावात लावण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे देखील हिंगणघाट पोलीस स्टेशनला दाखल झाले.

यावेळी मध्यस्थी करत तीन लाख रुपये मृतकांच्या कुटुंबियांना देऊ केल्याने सोहमचे प्रेत उचलण्यात आले.

अवैध रेती वाहतुकीचा 'बळी' ठरला 'सोहम'.....

हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव बोरगाव, सोनेगाव(धोटे), बीड नगाजी, पारडी घाट आहे. यातील घाटांवर अनिधिकृतरीत्या बोट आणि जेसिबीच्या साह्याने वाळूचा उपसा केला जात आहे. मात्र यावर महसूल विभागाच्या मेहरबानी असल्याने रात्री रेती वाहतूक करण्यास परवानगी नसताना अवैध रित्या वाहतूक केल्या जाते आणि याचाच बळी सोहम ठरला.
Body:पराग ढोबळे,वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.