नागपूर - पैशाच्या मोहापायी लोक कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही. वर्धा जिल्ह्यातही पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करत गुप्तधनासाठी युवतीचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेपोटी यात पीडितेसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. पीडित युवतीच्या आईनेही या अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी पीडितेचा एक नातलग व बाळू मंगरूटकर या दोघांना अटक केली आहे.
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेताना समाजात मात्र, अंधश्रद्धा अजून दूर झालेली नाही. पैशाचा पाऊस पडेल या अंधश्रद्धेतून युवतीचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अघोरी पूजा करून लाख, दोन लाख नव्हे तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाने केला होता. यासाठी पीडितेला निर्वस्त्र करत घृणास्पद प्रकार करण्यात आला.
पीडितेच्या आईला पैशांचे आमिष
पीडितेची आई एका दुकानात काम करत होती. तिथे ओळख झालेल्या महिलेने तिला मुलीची पूजा करत पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक असल्याचे सांगितले. तिथून छळाला सुरूवात झाली. पैसे मिळणार या आमिषाला बळी पडलेल्या पीडितेच्या आईनेही या अघोरी कृत्याला मंजूरी दिली. पीडितेच्या शरीरात मुंजा म्हणजेच अतृप्त आत्मा सोडून हा पैशाचा पाऊस पडण्याचा दावा आमिष मांत्रिकाकडून करण्यात आला. यात 80 कोटी रुपये पाडण्याचे अमिष दाखवत वर्षभर पीडितेसोबत घृषास्पद कृत्य करण्यात आले.
हेही वाचा - काविळसाठी तयार केले औषध, कोरोनावर ठरले गुणकारी, वाचा "रेमडेसिवीर" विषयी सबकुछ
पीडिता पळून गेल्याने प्रकार उघडकीस
पीडितेच्या हरवल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पीडितेचा तपास घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या अघोरी कृत्याचा भांडाफोड केला.
कोड शब्दाचा वापर
बोलताना इतरांना कळू नये म्हणून कोड्यात बोलले जात. मांत्रिकाला डॉक्टर असा शब्दप्रयोग केला जात होता. तर पीडितेला कुवारा पेपर, विधवा पेपर, डीआर अशा कोडिंग भाषेत संवाद साधला जात असे.
अनेक राज्यातील मांत्रिकांचा समावेश
या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यातील आरोपींचे तार बाहेर राज्यातील मांत्रिकांशी जुळलेले असल्याचे समोर येईल. हे मांत्रिक गुप्तधन पैसा, सोने नाणे मिळवून देण्याच्या बाता करत महिलांचे शोषण करतात. अनेक जण बदनामीच्या भीतीमुळे पुढे येत नाही. तर अशा अघोरी प्रकारास कुटुंबातीलच लोकांचांच पाठिंबा असल्यामुळे अनेक जण गप्प बसतात. पण असे न करता पोलीसांना किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत संपर्क करावा, असे आवाहन अभा अनिसचे महाराष्ट्र संघटक युवा शाखा पंकज वंजारे यांनी केले आहे.
हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक; त्रालमध्ये दोन, तर शोपियानमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा