ETV Bharat / state

'पोलीसवाले...तुकडे घेऊन जातात, म्हणून दारूचा धंदा असाच सुरू राहणार' - wardha police

गावात दारूचे पाट वाहत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या. पण, कारवाई नावापूर्तीच झाली. एकीकडे दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत.

liquor ban
वर्धा दारूबंदी महिला मंडळ
author img

By

Published : Jan 23, 2020, 8:21 AM IST

वर्धा - जिल्हा हा महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या पावनस्पर्शाने पुनित झाला आहे. या महान व्यक्तींमुळे जिल्ह्यात दारूबंदी 1975 पासून लागू झाली. पण, ही दारूबंदी इतक्या वर्षांनंतरही केवळ नावापुरतीच झाल्याचे पाहायला मिळते. याला विविध कारणे असली तरी महत्त्वाचे कारण म्हणजे, पोलिसांवर होणारे आरोप. हे आरोप म्हणजे दारूविक्रेत्यांशी पोलीस प्रशासनातील आर्थिक हितसंबंध हेच महत्त्वाचे कारण पुढे येताना दिसत आहे. यामुळेच स्थानिक पोलीस ठाण्यामधून न्याय न मिळाल्याने दारूबंदी मंडळाच्या महिलांनी आमदार पंकज भोयर यांच्यासोबत थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि अवैध दारूविक्रीमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला.

'पोलिसवाले...तुकडे घेऊन जातात, म्हणून दारुचा धंदा असाच सुरू राहणार'

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला मिळणार नवी झळाळी

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील वडगाव जंगली येथे सावित्रीबाई फुले दारूबंदी मंडळाच्या महिलांनी दारूबंदीचा विडा उचलला आहे. यापूर्वीही गावात दारूचे पाट वाहत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या. पण, कारवाई नावापूर्तीच झाली. एकीकडे दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तेच दुसरीकडे पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकत दारूविक्रेते खुलेआम विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, दारूविक्रेते याची कबुलीही देतात. पोलिसवाले येतात हप्त्याचे तुकडे घेतात आणि जातात. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी धंदा असाच सुरू राहणार, असे दारूविक्रेते बोलत असल्याचा आरोप दारूबंदी मंडळाच्या महिलांनी केला.

गावात दारूबंदी व्हावी. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार पुन्हा उभे रहावे यासाठीच दारूबंदी मंडळाच्या माध्यमातून महिलांची दारूबंदीसाठी धडपड सुरू असते. आज हे चित्र पोलीस अधीक्षक कार्यालयात पाहायला मिळाले. एक लहान मुलगा आपल्या आईचे बोट धरून दारूबंदीची व्यथा मांडणाऱ्या आपल्या आईसोबत आला होता. दारूबंदी काय असते, याचे परिणाम त्याला नक्कीच माहीत नाही. पण, याची जाणीव असणारी आई अशा अनेक लहान मुलांचे भविष्य सुकर होण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस अधीक्षक कार्यालयात दिसली.

liquor ban
दारूबंदी मंडळाच्या महिलांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

महिलांना कुठेच न्याय न मिळाल्याने त्या आमदार पंकज भोयर यांच्याकडे गेल्या. त्यांनी हा प्रकार आमदारांना सांगितला. दारूविक्रेत्यांचे नाव त्यांना सांगितले, कारवाई होत नसल्याचे दुःख मांडले. पण, पोलिसांबद्दल दारूविक्रेत्यांचे वक्तव्य एकताच हा प्रकार अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या दालनात महिलांनी मांडला. यावर येत्या तीन चार दिवसात कठोर कारवाई करण्याचे अश्वासनही त्यांनी दिले. पण, दारूबंदी असताना चोरट्या मार्गाने येणारी बनावट दारू आणि त्याचा होणारा परिणाम पाहता कठोर कारवाई करण्याचा विषय आमदार पंकज भोयर यानी लावून धरला.

मुजोरी करत दारू विकणाऱ्यांना कायद्याच्या बेड्या घालून अंकुश लावणे गरजेचे आहे. यात महिलांना आता तरी न्याय मिळणार का? पोलीस विभाग स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी तरी प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

वर्षाला होणाऱ्या कारवाया -

दररोज जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी पाहता, शेकडो गुन्हे दाखल केले जातात. या प्रमाणे वर्षाला 10 ते 12 हजार गुन्हे दाखल होतात. कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल नष्ट होतो तर काही जप्त होतो. वर्षाला केवळ 5 ते 10 प्रकरणात न्यायालयातून शिक्षा झालेली असते. हे प्रमाण आणि झालेली शिक्षा यामुळेही दारूबंदी फोफावली असल्याचे भीषण परिस्थिती नाकारली जाऊ शकत नाही.

Intro:mh_war_darubandi_vastav_pkg_7204321

बाईट- आशा प्रभाकर पेंदाम, वडगांव जंगली, वर्धा.
बाईट- पंकज भोयर आमदार वर्धा.

पोलिसवाले....तुकडे घेऊन जातात, म्हणून दारुचा धंदा असाच सुरू राहणार.....

- आमदार पंकज भोयरसह दारू बंदी महिला मंडळ थेट पोलीस अधीक्षक कार्यलयात दाखल
- पोलीस वाल्याना कुत्रे म्हणल्याचा आरोप महिलांनी केला
- अप्पर पोलीस अधीक्षकांन समोर मांडले गऱ्हाणे
- येत्या आठवड्यात कारवाई करूच दिले आश्वासन

वर्धा जिल्हा महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालाय.. या महान विभूतींमूळ जिल्ह्यात दारूबंदी 1975 पासून लागू झाली. पण ही दारूबंदी इतक्या वर्षांनंतरही केवळ नावापुरतीच दिसल्याचे पाहायला मिळते. याला विविध कारण असले तरी महत्वाचे कारण म्हणजे पोलिसांवर होनारे आरोप. हे आरोप म्हणजे दारू विक्रेत्यांशी पोलीस प्रशासनातील आर्थिक हितसंबध हेच महत्वाचे कारण पुढे येतांना दिसतात. यामुळेच स्थानिक पोलीस स्टेशनमधून न्याय न मिळाल्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आमदार पंकज भोयर यांच्या सोबत महिला पोहचल्या. यावेळी महिलांनी अवैध दारूविक्रीमुळे होणार त्रास बोलून दाखवला.

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील वडगाव जंगली येथील सावित्रीबाई फुले दारूबंदी महिला मंडळाच्या महिला आहेत. यापूर्वीही गावात दारूचे पाट वाहत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या... पण कारवाई नावापूर्तीच झाली. एकीकडे दारूमुळे संसार उद्धवस्त होतआहेत. तेच दुसरीकडे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगत दारु विक्रेते खुलेआम धंदा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दारू विक्रेते याची कबुलीही देतात. यामुळेच दारूविक्रेते 'पोलिसवाले कुत्रे येतात हपत्याचे तुकडे घेतता आणि जातात' कोणी कितीही तक्रारी केल्या तरी धंदा असाच सुरू राहणार असे बोलत असल्याचा आरोप दारूबंदी मंडळाच्या महिलेने केला.

गावात दारूबंदी व्हावी. दारुमुळे उध्वस्त होणारे संसार पुन्हा उभा राहावे यासाठीच दारूबंदी मंडळाच्या माध्यमातून महिलांची दारूबंदीसाठी धडपड सुरू असते. पण ही धडपड असते मुलांबाळासाठी. आज हे चित्र पोलीस अधीक्षक कार्यलायत महिलांमध्ये पाहायला मिळाले. एक लहान मुलगा आपल्या आईचा बोट धरून दारू बंदीची व्यथा मांडणाऱ्या आपल्या आईला सोबत चालत होता. दारू बंदी काय असते यांचे परिणाम त्याला नक्कीच माहीत नाही. पण याची जाणीव असणारी आई अश्या अनेक बालकांचे भविष्य सुकर होण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस अधीक्षक कार्यलायत दिसली.

महिलांना कुठेच न्याय न मिळाल्याने महिला आमदार पंकज भोयर यांचकडे गेल्या. त्यानी हा प्रकार सांगितला. दारू विक्रेत्याचे नावं सांगितले कारवाई होत नसल्याचे दुःख मांडले. पण पोलिसांबद्दल दारू विक्रेत्याचे वक्तव्य एकताच हा प्रकार अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या दालनात महिलांना घेऊन दालनात पोहचले. यावर येत्या तीन चार दिवसात कठोर कारवाई करण्याचे अश्वासनही त्यांनी दिले. पण दारूबंदी असताना चोरट्या मार्गाने येणारी बनावट दारू आणि त्याचा होणारा परिणाम पाहता कठोर कारवाई करण्याचा विषय आमदार पंकज भोयर यानी लावून धरला.

जिल्ह्यात 1975 पासून दारुबंदिची होऊन ही दारूबंदी अपयशी का झाली हे सांगायला कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. पण मुजोरी करत दारू विकणाऱ्याना कायद्याची बेड्या घालून अंकुश लावणे गरजेचे आहे. यात महिलांना आता तरी न्याय मिळणार का, पोलीस विभाग स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी तरी प्रयत्न ठोस पाऊले उचलत कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे.

वर्षाला होणाऱ्या कारवाई

दररोज जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन पाहता शेकडो गुन्हे दाखल केले जाते. या प्रमाणे वर्षाला 10 ते 12 हजार गुन्हे दाखल होतात. कोट्यवधी रुपयाचा मुद्देमाल नष्ट होतो. काही जप्त होतो. वर्षाला केवळ 5 ते 10 प्रकरणात न्यायालयातून शिक्षा झाली असते. हे प्रमाण आणि झालेली शिक्षा यामुळेही दारूबंदी फोफावली भीषण वास्तव नाकारल्या जाऊ शकत नाही.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.