ETV Bharat / state

वर्ध्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; मोबाईलचा उपयोग बेतला जीवावर - वर्धा बामती

जिल्ह्यात अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. संतोष बोबडे यांच्या शेतात बुधवारी कामासाठी दोन मजूर होते. यावेळी दुपारी ढग दाटून आले. यावेळी शेतात 10 ते 12 मजूर असून यात महिलांचाही समावेश होता.

वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
author img

By

Published : Sep 25, 2019, 11:11 PM IST

वर्धा- सध्या दररोज पावसाचे सत्र सुरू असून मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाटही होत आहे. अशातच विजांचा कडकडाट सुरू असताना मोबाईलचा उपयोग टाळावा, असे सांगितले जाते. सेलू तालुक्यातील वडगाव येथे मोबाईलचा उपयोग करत असताना अचानक वीज पडली आणि शेतकऱ्याच्या जीवावर बेतले. संतोष बोबडे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा- भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, हजारो कार्यकर्ते तुरुंगात जायला तयार - नवाब मलिक

जिल्ह्यात अनेक भागात विजेच्या तांडवासह पावसाने दमदार हजेरी लावली. संतोष बोबडे यांच्या शेतात बुधवारी कामासाठी दोन मजूर होते. यावेळी दुपारी ढग दाटून आले. यावेळी शेतात 10 ते 12 मजूर असून यात महिलांचाही समावेश होता. विजेचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतातील कडुलिंबाच्या झाडा खाली जाऊन शेतकऱ्यांनी आसरा घेतला. यावेळी सुभाष बोबडे यांच्यासह अशोक उईके (40) आणि बाबूलाल भालावी (35) हे दोघेही उभे होते. एवढ्यात संतोष बोबडे हे मोबाईल पावसात भिजला की नाही पाहत असताना त्यांच्या वीज अंगावर पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. यामुळे मोबाईल वापरणे संतोष बोबडे यांचा जीवावर बेतले.

हेही वाचा- बालाकोटमधील दहशतवादी सक्रिय; मात्र, त्यांना तोंड देण्यास लष्कर समर्थ - राजनाथ सिंह

बाबूलाल भालावी यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. अशोक उईके हे यात बचावले असून त्यांना किरकोळ स्वरुपात दुखापत झाली. सेलू पोलिसात घटनेची नोंद झाली असून महसूल प्रश्नासनाकडूनही घटनेचा पंचनामा करण्यात आला.

विजांचा कडकडाट होत असतानाच मोबाईलचा वापर करू नसे, असे तज्ज्ञांनाकडून सांगितले जाते. तसेच विजेचा कडकडाट सुरू असताना झाडांचा आसरा घेऊ नये, असे सांगितले जाते. मात्र, याबाबत कोणीही सतर्कता घेत नाही. यामुळेच याचा गंभीर परिणाम अनेकांच्या जीवावर बेततो.

Intro:mh_war_lighting_kill_vis1_7204321

वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू, मोबाईलचा उपयोग जीवावर बेतला

वर्धा - सध्या दररोज पावसाचे सत्र सुरू असून मोठ्या प्रमानात विजांचा कडकडाट होत आहे. अशातच विजय सुरू असताना मोबाईलचा उपईग टाळावा असे सांगितले जाते. सेलू तालुक्यातील वडगाव येथे मोबाईलचा उपयोग करत असताना अचानक वीज पडली आणि शेतकऱ्यांचा जीवावर बेतले. यासह सोबत असणारे दोघे जखमी झाले. संतोष बोबडे वय 70 असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

आज ही जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या तांडवासह पावसाची दमदार हजेरी लावली. यात संतोष बोबडे हे यांच्या शेतात आज निंदनाचे काम असल्याने मंजूर सांगितले होते. यावेळी दुपारी ढग दाटून आले. यावेळी शेतात 10 ते 12 मजूर असून यात महिलांचाही समावेश होता. विजेचा कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतातील कडुलिंबाच्या झाडा खाली जाऊन आसरा घेतला. यावेळी सुभाष बोबडे यांच्यासह अशोक उईके (40), आणि बाबूलाल भालावी(35) हे दोघेही उभे होते. एवढ्यात संतोष बोबडे हे मोबाईल पावसात भिजला की नाही पाहत असतांना मोबाईल हातात असतांनाच वीज अंगावर पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. यामुळे मोबाईल वापरने संतोष बोबडे यांचा जीवावर बेतले असेच बोलले जात आहे.

यात सुरवातीला सेलू येथील रुग्णलायत नेण्यात आले. यावेंळी डॉक्टरांनी संतोष बोबडे यांना मृत घोषित केले. तर बाबूलाल भालावी यांच्यावर उपचार सुरू केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. तेच अशोक उईके हे बचावले असुन त्यांना किरकोळ स्वरूपात दुखापत झाली. सेलू पोलिसात घटनेची नोंद झाली असून महसूल प्रश्नासनाकडूनही घटनेचा पंचनामा करण्यात आला.

विजांचा कडकडाट होत असतानाच मोबाईलचा वापर करू नसे असे तज्ज्ञांनाकडून सांगितले जाते. तसेच विजेचा कडकडाट सुरू असताना झाडाचा वापर करू नये असे सांगितले जात असताना या बाबात गंभीरता घेतली जात नाही. यामुळेच याचा गंभीर परिणाम अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.