ETV Bharat / state

'धाम' ओव्हरफ्लो, बाप्पांनी केले जलसंकट दूर

author img

By

Published : Sep 4, 2019, 5:02 PM IST

वर्धा शहर आणि गावांसह उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'धाम' ओव्हरफ्लो

वर्धा - यंदा सुरवातीलाच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै मध्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामध्ये वर्धा शहर आणि गावांसह उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'धाम' ओव्हरफ्लो

धाम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकर्‍यांना वर्षभर रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार आहे. सोबतच वर्धा शहर आणि पिपरीसह 11 गावे आणि उद्योगांनाही पाणी मिळणार आहे.

आर्वी तालुक्यात धाम नदीवरील महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे. याच धाम नदीवरून शहरासह 11 गावे तसेच एमआयडीसी, रेल्वे, उद्योगांना पाणी पुरवठा होतो. गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान पाहता सप्टेंबर महिन्यापासूनच पाणी कपातीला सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 15 दिवसांनी सुरू होता. मे, जून महिनाअखेर कोरडा ठाक पडलेल्या प्रकल्पातील मृत जलसाठा उपसा करत वर्ध्याची तहान भागवण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 37 टक्के पाणी साठा होता. तोच धाम प्रकल्प यंदा 100 टक्के भरला आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती -

जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये एकूण 63.92 टक्के जलसाठा सध्या असून 8 प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प,पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल-नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प आणि सुकळीच्या लघु प्रकल्पाचा समावेश आहे. तर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या नांद प्रकल्प आणि वडगाव प्रकल्पामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर २० लघु प्रकल्पांपैकी १० प्रकल्प पूर्ण भरले आहे. धाम मध्यम प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 328.66 मीटर आहे.

Intro:mh_war_01_dham_dam_full_pkg_7204321

बाईट- विनोद आदेवार, उपकार्यकरी अभियंता, पाटबंधारे विभाग,वर्धा.

बाईट- अतुल तराळे, नगराध्यक्ष.

....बाप्पा....धाम ’ओव्हरफ्लो’ बाप्पांनी जलसंकट केले दूर

- शेतकरी, उद्योजक, सर्वसामान्यांना आनंद
- रब्बी हंगामात सिंचनाकरीता शेतकऱ्यांनाही मिळणार पाणी

वर्धा - यावर्षी सुरवातीला पावसाची दांडी हे चिंता वाढवणारी होती. मात्र जुलै मध्यानतंर ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामध्ये वर्धा शहर आणि गावांसह उद्योग, शेतकर्‍यांकरीता महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्पाच्या सांडव्यावरून
पाणी वाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभरानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकरीता पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोबतच वर्धा शहर आणि पिपरी अधिक अकरा गावे, उद्योगांनाही पाणी मिळणार असल्याने संकटाच दूर झाले आहे.

आर्वी तालुक्यात धाम नदीवर निर्मित महाकाळी येथील धाम प्रकल्प
जिल्ह्याकरीता महत्त्वाचा आहे. याच धाम नदीवरून शहरासह 11 गावे तसेच एमआयडीसी, रेल्वे, उद्योगांना पाणी पुरवठा होतो. मागील वर्षी कमी पर्जन्यमान पाहता सप्टेंबर महिनीपासूनच पाणी कपातील सुरवात झाली होती. विशेष म्हणजे पिण्याचे पाण्याचा पुरवठा 15 दिवसांनी सुरू होता. मे जून महिन्या अखेर कोरडा ठाक पडलेल्या प्रकल्पातील मृत जलसाठा उपसा करत वर्धेकरांची तहान भागवण्यात आली. मागील अनेक वर्षाचा इतिहास पाहता मृत जलसाठा उपयोगात आणण्याची वेळ आली नव्हती. यंदा मात्र हे जलसंकट बाप्पाच्या अगमनासह धाम प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 37 टक्के पाणी साठा होता. तोच धाम प्रकल्प यंदा बाप्पा पावल्याने 100 टक्के भरला आहे.

जिल्ह्याच्या ११ मोठे आणि मध्यम प्रकल्प परिस्थिती........

एकूण ६३.९२ टक्के जलसाठा सध्या असून आठ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प ,पंचधारा प्रकल्प , डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प आणि सुकळीचा लघु प्रकल्पाचा समावेश आहे. तर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या नांद प्रकल्प आणि वडगांव प्रकल्पामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर २० लघु प्रकल्पांपैकी १० प्रकल्प पूर्ण भरले आहे.

यात धाम मध्यम प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ३२८.६६ मीटर आहे. प्रकल्पात ९.९५० दशलक्ष घनमीटर संस्थतीत साठा असून ५९.४८५ दशलक्ष घनमीटर साठा उपयुक्त
साठा समजला जातो.

सर्वांनाच पाणी मिळणार......

यावर्षी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना, उद्योग, शेतीलाही पाणी मिळेल. त्याकरीता आवश्यक नियोजन करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी विनोद आदेवार यांनी ईटीव्ही भारतला दिली.

नागरिकांनी पाण्याचे नियोजन करणार......
मागील उन्हाळ्यात पाणी कपात करावी लागली होती. प्रकल्प ओसंडून वाहत
असल्याने यावर्षी बाप्पा पावले असल्याचे हे संकट दूर झाल्याचे नागराध्यक्ष अतुल तराळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले. पण, प्रकल्प ओसंडून वाहिल्यानंतर
पाण्याचा अपव्यय होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे
पाण्याचे योग्य नियोजन करू असेही ते म्हणाले.

यंदा कधी नव्हे असा पाण्याचा दुष्काळ वर्धेकरांना जून महिन्यात अनुभवायला मिळाला. पाण्याची पातळी खाली गेल्याने बोअर कोरडे ठाक पडले होते. पण पावसाने तूट असलेली सरासरी भरून काढत तब्बल सरासरी 720.91 मिमी पाऊस झाला आहे. एकूण 920.71 मिमी पाऊस हा पडत असतो.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.