ETV Bharat / state

'पालकांनी चिंता करण्याची गरज नाही, नवोदयचे सर्व विद्यार्थी सुरक्षित' - all jawahar navodaya vidyalaya students are safe

नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. गवई यांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. तसेच, सोनिपतच्या एसडीएमने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

नवोदय विद्यालय
नवोदय विद्यालय
author img

By

Published : Mar 29, 2020, 3:37 PM IST

वर्धा- सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे तिथेच अडकून पडले आहेत. वर्ध्याच्या सेलू (काटे) येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे इयत्ता नववीचे विद्यार्थी सोनीपतच्या जवाहर नवोदय विद्यालयात आहे. अभ्यासक्रमानुसार स्थलांतरित केलेले हे सगळे विद्यार्थी सुखरूप, सुरक्षित आहेत. त्यामुळे पालकांनी काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे प्राचार्य एस. जी. गवई यांनी कळवले आहे. अशापद्धतीने अनेक विद्यालयांचे विद्यार्थी अडकून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे.

नवोदय विद्यालय
नवोदय विद्यालय

वर्ध्याच्या सेलू (काटे) येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या नववीच्या 21 विद्यार्थ्यांना 'मायग्रेशन'अंतर्गत सोनीपतच्याच्या नवोदय विद्यालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये दोन्ही शाळेच्या मुलांना एक्स्चेंज पद्धतीने पाठवले जाते. यामध्ये सोनीपतचे विद्यार्थी इथे आले होते. मात्र, त्यांना 'मायग्रेशन' संपत आल्याने परत पाठवण्यात आले. पण, वर्ध्याचे विद्यार्थी येण्याच्या दिवशीच लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे आणि विद्यार्थ्यांना सोनीपतहून पाठवता आले नाही.

लॉकडाउन जाहीर झाले आणि विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्याही जीव अडकल्यासारखा झाला. विद्यार्थी वर्ध्याला कधी परतणार, मुले कशी असतील या प्रश्नाने चिंता वाढवली आहे. सोनीपतला असलेल्या विद्यार्थ्यांची प्रशासन काळजी घेत आहे. तिथल्या एसडीएमनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. सोनिपतचे प्राचार्यही सातत्याने संपर्कात आहेत. विद्यार्थी सोनीपतला सुखरूप आणि सुरक्षित असल्याचे तेथील प्राचार्यांनी सांगितले आहे.

सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे तातडीच्या सेवा वगळता संचारबंदी करण्यात आली. सोनीपत ते वर्धा हे अंतरही लांब आहे. अशीच स्थिती देशातील इतर नवोदय विद्यालयात असू शकते. नवोदयचे प्रशासन विद्यार्थ्यांची काळजी घेतच आहे. त्यामुळे पंधरा दिवस प्रतीक्षा केलेलीच बरी आणि मुलं सुखरूप असल्याने काळजी घेण्याची गरजही नसल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.