ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरूणीचा मृतदेहावर संविधान चौकात पुष्पवृष्टी तर पोलिसांवर दगडफेक - हिंगणघाट जळीतकांड लेटेस्ट बातमी

हिंगणघाट येथील संविधान चौकामध्ये मृत तरूणीचा मृतदेह घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेवर स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दुसरीकडे दारोडा गावात रुग्णवाहिका आणि पोलिसांवर संतप्त गावकऱ्यांनी दगडफेक केली.

citizens thrown flowers on the deadbody of hinganghat victmis
हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरूणीचा मृतदेहावर संविधान चौकात पुष्पवृष्टी
author img

By

Published : Feb 10, 2020, 2:21 PM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील तरूणीचा आज (सोमवारी) सकाळी मृत्यू झाला. तरुणीचा मृतदेह नागपूरवरुन रुग्णवाहिकेतून दारोडा गावात आणण्यात आला. यावेळी हिंगणघाट येथील संविधान चौकामध्ये मृत तरूणीचा मृतदेह आल्यावर स्थानिकांनी तिच्यावर पुष्पवृष्टी करून श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा चोख बंदोबस्त ठेवला होता. मृतदेह घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेवर तरुणीचे मुळगावी दारोडा येथे मात्र दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरूणीचा मृतदेहावर संविधान चौकात पुष्पवृष्टी तर पोलिसांवर दगडफेक

पीडित तरुणीचा मृतदेह तिच्या गावी आल्यावर नागरिकांनी पोलिस आणि रुग्णवाहिकेवर तुफान दगडफेक केली. रुग्णवाहिका गावात येण्यापासून अडविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आरोपीला प्रथम शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत होती.

तरुणीचा सात दिवस मृत्यूशी झुंज अपयशी
हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज (सोमवारी) आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे.

citizens thrown flowers on the deadbody of hinganghat victmis
रूग्णवाहिकेवर दगडफेक

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : सोमवारी सकाळीच पेट्रोल हल्ला अन् मृत्यूही सोमवारीच

दरम्यान, पीडितेच्या कुटंबीयांना शासनाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

Intro:Body:हिंगणघाट येथील संविधान चौकामध्ये मृतक प्राध्यापिका केशव आपल्या जन्मगावी नेत असतांना त्यांनी तिच्यावर पुष्पवृष्टी करून श्रद्धांजली वाहिली यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा यावेळी संविधान चौकामध्ये देण्यात आल्या यावेळी पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा चोख बंदोबस्त लावण्यात आला होताConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.