ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - wardha district news

हिंगणघाट येथील बहुचर्चित जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याच्या विरोधात गुरुवारी (दि. 17 डिसें.) न्यायलयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 17, 2020, 7:27 PM IST

Updated : Dec 17, 2020, 8:48 PM IST

वर्धा - जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील बहुचर्चित जळीतकांड प्रकरणातील आरोपी विरोधात दोषारोपपत्र हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आले. यातील आरोपी विकेश नगराळे विरोधात पाठलाग आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी गुरुवारपासून (दि. 17 डिसें.) न्यायालयात सुरू करण्यात आली आहे. तसेच 11, 12 व 13 जोनेवारी, 2021 दिवशी साक्ष व पुरावे न्यायालयासमोर ठेवले जाणार आहेत. या तिन्ही दिवासत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यायलयीन कामकाजावेळी विकेश नगराळे याच्यावर पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग करणे, तिची पेट्रोल टाकून जाळून हत्या करणे, असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असता विकेशने हे गुन्हे कबून नसल्याचे सांगितले. यामुळे कामकाज पुढील तारीख देत आजच्या दिवसाचे कामकाज तहकुब करण्यात आले. यावेळी प्रसाद सोईतकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने कामकाज पाहिले. विकेश नगराळेकडून नागपूर येथील वकील भुपेंद्र सोने यांनी कामकाज पाहिले.

का? गैरहजर होते विकेश नगराळेचे वकील

या प्रकरणात 14 डिसेंबरला दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवण्यात येणार होते. मात्र, त्यावेळी विकेशचे वकील भुपेंद्र सोने हे गैरहजर असल्याने गोंधळ उडाला होता. यावर बुधवारी (दि. 17 डिसें.) दुसऱ्या वकिलांनीही वकिलपत्र न्यायालयासमोर सादर केले. मात्र, नगराळेने भुपेंद्र सोने हेच त्याचे वकील म्हणून काम पाहणार असल्याचे सांगितले. यावेळी 14 डिसेंबरला दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीत सोने असल्याने हजर होऊ शकले नसल्याचे सांगितले.

सलग तीन दिवस चालणार कामकाज

आता या प्रकरणाला नवीन वर्षात गती प्राप्त होणार आहे. यात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 11, 12 आणि 13 तारखेला साक्ष व पुरावे न्यायालया समोर नोंदवले जाणार आहेत. या तीन दिवसाचे कामकाज महत्वाचे असणार आहे. सोबतच तिन्ही दिवस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा - वर्धा जळतीकांड प्रकरण, आरोपी विकेश नगराळेचे वकील न्यायालयात गैरहजर

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात दाखल

Last Updated : Dec 17, 2020, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.