वर्धा- नागपूर-मुंबई डाऊनलाईनवरील रेल्वे ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली होती. सेलू ते तुळजापूर दरम्यान ट्रॅकला तडा गेल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. वेळीच लक्षात आले असले तरी दुरुस्तीसाठी तब्बल दोन तास लागल्याने विदर्भ एक्स्प्रेससह अन्य महत्वाच्या गाडया तब्बल दोन तास उशिराने धावाल्या.
वर्ध्यातील सेलू ते तुळजापूर या दोन छोट्या रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले होते. यालाच रेल्वेच्या प्रशासकीय भाषेत ट्रॅक फॅक्चर असे संबोधले जाते. दरम्यान, रुळाला तडे गेल्याचे लक्षात येताच ब्रेक डाऊन टीमला याची माहिती देण्यात आली. टीमने तात्काळ ट्रॅक दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान या काळात दोन तास वाहतूक खोळंबली होती. ट्रॅक दुरुस्त होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, वाहतूक खोळंबल्याचा फटका प्रवाश्यांना बसला. नोकरी, शाळा आणि कॉलेजसाठी ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
मेल आणि एक्सप्रेस गाड्या प्रभावित
विदर्भ एक्स्प्रेससह अन्य गाड्यांमध्ये हावडा मेल, नागपूर-पुणे, नागपूर-अमरावती इंटरसिटी, आझाद हिंद, दक्षिण एक्स्प्रेस, प्रेरणा एक्स्प्रेस यासह विविध गाड्या प्रभावित झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यात ७.४० ते ९.४० वाजता धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या देखील समावेश आहे. दरम्यान, रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला असून. रेल्वे वाहतूक नियमित करण्यात आली आहे. काही गाड्या उशिराने धावत आहे. हा ट्रॅक फ्रॅक्चर होण्याचे नेमके कारण अद्याप कळले नाही. लवकरच यांचे कारणे शोधले जातील. सध्या वाहतूक सुरळीत झाल्याचे नागपूर डिव्हिजनचे जनसंपर्क अधिकारी अनिल वालदे यांनी 'ईटीव्ही भारतला' सांगितले आहे.
हेही वाचा- वर्धा: आरोपींना न्यायालयात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात