वर्धा - पूलगाव येथील एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूलगावच्या तेलघाणी फैलात ही घटना घडली आहे. याप्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
जयकुमार वानी असे मृत तरुणाचे नाव आहे. वानी हा डी.जे साऊंड सिस्टिमचा व्यवसाय करत होता. रात्री दहा वाजताच्या सुमारास मारेकऱ्यांनी वानीला गाठले. त्यानंतर मारेकऱ्यांनी तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केले. यात जयकुमारचा मुत्यू झाला. त्यानंतर मारेकरी घटना स्थळावरून पसार झाले. सदर घटनेचा तपास पूलगाव पोलिसांकडून केला जात आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.