मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती पदाचा कारभार भाजपच्या वंदना पाटील यांनी आणि भाजपचे दिलीप जैन यांनी परिवहन सभापती पदाचा कारभार स्वीकारला आहे. मीरा भाईंदर मनपा मुख्यालयात असलेल्या कार्यालयाचा उद्घाटन महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
![महिला व बालकल्याण आणि परिवहन सभापती न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-thn-01-mbmcmbmt-mh10031_02022021160718_0202f_1612262238_979.jpg)
मीरा भाईंदर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीसाठी सेनेच्या तारा घरत व भाजपच्या वंदना पाटील यांच्यात लढत झाली या निवडणुकीत सभापतीपदी भाजपच्या वंदना पाटील तर, उपसभापतीपदी भाजपच्या सुनीता भोईर यांची निवड झाली. वंदना पाटील या भाईंदर पूर्वेच्या नगरसेविका आहेत. जेष्ठ नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन करत सभापती पदाचा कारभार स्वीकारला आहे.
हेही वाचा - प्रशासनच ठरलं.. 8 ते 17 या कालावधीत होणार सरपंच-उपसरपंचाची निवड
परिवहन सभापती दिलीप जैन
मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन समितीच्या निवडणूकित सेनेचे राजेश म्हात्रे व भाजपचे दिलीप जैन यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे दिलीप जैन हे विजयी झाले. मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असून सर्व समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. मीरा भाईंदर परिवहन समिती सभापती कार्यकाळ मार्च २०२० मध्ये संपुष्टात आला होता. तत्कालीन सभापती मंगेश पाटील यांना संधी मिळाली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना काम करायची संधी मिळाली नाही. येणाऱ्या २०२२ च्या महानगरपालिका निवडणूक पाहता भाजपने दिलीप जैन यांना संधी देऊन भविष्यात मतांचा फायदा होईल या विचाराने भाजपने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. कार्यालयाचे उद्घाटन करत परिवहन समिती सभापती पदाचा कारभार जैन यांनी स्वीकारला आहे.
हेही वाचा - बीड : ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी