ठाणे - मीरा भाईंदर शहराचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे ह्या भारतीय सैन्यदलात सामील होऊन त्या 'लेफ्टनंट कर्नल' झाल्या आहेत. त्या चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत त्यांनी शनिवारी लेफ्टनंट पदाचे दोन 'स्टार्स' खांद्यावर चढवले व परिस्थितीचा आणि पोबारा करत न-बसता त्या पुन्हा त्याच हिमतीने त्यांनी पतीच्या वीरमरणानंतर सैन्यदलात भरती होऊन अथक मेहनत घेऊन त्या शनिवारी लेफ्टनंट झाल्या आहेत.
शहीद मेजर कौस्तुभ राणे -
मेजर कौस्तुभ राणे हे ऑगस्ट २०१८ मध्ये काश्मीरच्या गुरेझ सेक्टर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद होऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा हा फक्त दोन वर्षांचा होता व कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका राणे या मुंबईत एका ठिकाणी नोकरी करीत होत्या. आपले पती देशाकरिता शहीद झाल्यानंतर, कनिका यांनी स्वतःहून लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परीक्षा तसेच मुलाखतीत अग्रेसर येत त्यांची प्रशिक्षणासाठी मागील २०१९ साली निवड झाली. त्यांनी हे अथक व कडक प्रशिक्षण पूर्ण करीत त्या आता भारतीय सैन्यदलात (लष्करात) अधिकारी झाल्या आहेत. एरव्ही मुले लहान असले, की त्याची आई नोकरीतून ब्रेक घेते. मात्र, कनिका यांनी मात्र मुलगा लहान असतानादेखील नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण दूर चेन्नईत राहून घेतले हे विशेष आणि कौस्तुकास्पद आहे.
देशहितासाठी सीमेवर लढा देणारे देशाचे सैनिक यांना वंदन करून देशकार्यात मोलाचे योगदान देणारे शहीद जवान कौस्तुभ राणे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात पत्नी कनिका राणे, चार वर्षांचा मुलगा अगस्त व मातोश्री ज्योती राणे आणि वडील प्रकाश (काका) राणे हे आहेत, तर कौस्तुभ यांना वीरमरणोत्तर १५ ऑगस्ट २०१९ साली सेना मेडल या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे, तर त्यांच्या पत्नीने परिस्थितीचा कांगावा न-करता समाजात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण करत त्या आज भारतीय सैन्यदलात 'लेफ्टनंट' झाल्या आहेत.