ठाणे - माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या जुन्या आठवणी कायम आपल्या सोबत ठेवतो. याचेच एक उदाहरण ठाण्यात पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी रिक्षा चालवून जूने दिवस विसरलो नसल्याच्या भावना व्यक्त केल्या.
ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे मोठे बांधकाम व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावाने अनेक कंपन्या आहेत, असे असले तरी त्यांच्या आयुष्याची सुरुवात ही खडतर झालेली आहे. सुरुवातीला काही दिवस रिक्षा चालवून त्यांनी आपला चरितार्थ चालवला होता, आणि आज त्या मेहनतीच्या जोरावर ते व्यावसायिक झाले आहेत.
रविवारी एका कार्यकर्त्याच्या नवीन रिक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. अशावेळी त्यांनी आपला जुना व्यवसाय आठवून रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. माणसाने कितीही मोठे झाले तरी आपले जुने दिवस विसरू नये, असा सल्ला सरनाईक यांनी यावेळेस कार्यकर्त्यांना दिला. सरनाईक यांना रिक्षा चालवताना पाहन्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या 'या' वक्तव्याची माधव भांडारींनी उडवली खिल्ली
ठाण्यातील अनेक नेते हे आधी रिक्षाचालक होते. त्यामध्ये प्रताप सरनाईक, सुधाकर चव्हाण आणि अगदी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या आयुष्याची सुरुवात रिक्षा चालवून केलेली आहे.
हेही वाचा - नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार, युवकांचा लक्षणीय सहभाग