ETV Bharat / state

Prison fights : तंबाकू मळण्यावरून दोन कैद्यांत जेल मधे हाणामारी - Fir against prisoners

शिक्षा भोगत असलेला एक कैदी तंबाकू मळत असतानाच दुसऱ्याने तंबाकू नको मळू माझ्या जेवणात पडेल. असे सांगितल्या वरुन तंबाकू खाणाऱ्या कैद्यााने जाब विचारणाऱ्या कैद्याला बेदम मारहाण केल्याची (Violent clashes between inmates in the jail) घटना घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर कैद्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा (Fir against prisoners) दाखलकेला आहे.

Aadharwadi Jail
आधारवाडी जेलमध्ये
author img

By

Published : Mar 21, 2022, 1:40 PM IST

ठाणे: मारहान प्रकरणात संतोष साळूंके याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर या घटनेत दानिश उर्फ मेंटल उमर इंजिनियर (२७) हा कैदी मारहाणीत जखमी झाला आहे. जखमी दानिश हा अंबरनाथ शहरात राहणारा असून तो एका गुन्ह्यात आधारवाडी जेलमधील बॅरेक १ मधील ५ नंबर सर्कलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर त्याच बॅरेकमध्ये हल्लेखोर कैदी संतोष महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका गुन्ह्यासाठी २ जानेवारी २०२२ पासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यातच १६ मार्च रोजी रात्री साडे आठच्या सुमारास कैदी दानिश हा जेवण करत होता. तर हल्लेखोर कैदी संतोष हाताने तंबाखु मळत झटकत होता. त्यावेळी मी जेवण करतो तंबाकू झटकू नको असे सुनावले असता, हल्लेखोर कैदी संतोषला राग आला आणि त्याने दानिशला शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच दानिशच्या तोंडावर जोरदार बुक्का मारून त्याचा एक दात पाडला. कैदयांची हाणामारी पाहून जेल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दानिशला जेलमधील रुग्णालयात नेले. तर कैदी दानिशच्या तक्रारीवरून संतोषवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास व्ही. एस. केदार करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.