ETV Bharat / state

समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्या दोघांना कामोठे पोलिसांनी केली अटक - Two persons arrested for viral rumors during lock down

टाळेबंदीत सरकार अन्न धान्य देत नसल्याचे सांगत मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांना घरी जाण्याची सोय करावी, असे विधान करत परप्रांतीय मजुरांमध्ये अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्या दोघांना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. पनवेलच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कामोठे पोलिसांनी कमलेश दुबे याला कामोठे येथून अटक केली आहे.

Two persons arrested for viral rumors during lock down
अफवा पसरविणाऱ्या दोघांना कामोठे पोलीसांनी केली अटक...
author img

By

Published : Apr 16, 2020, 4:31 PM IST

नवी मुंबई - टाळेबंदीत सरकार अन्न धान्य देत नसल्याचे सांगत मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांना घरी जाण्याची सोय करावी, असे विधान करत परप्रांतीय मजुरांमध्ये अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्या दोघांना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. पनवेलच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कामोठे पोलिसांनी कमलेश दुबे याला कामोठे येथून अटक केली आहे.

समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्या दोघांना कामोठे पोलीसांनी केली अटक.

मंगळवारी वांद्रे स्थानकासमोर झालेल्या गर्दीप्रकरणी समाजमाध्यमांवर विविध लघुसंदेशाने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे नवी मुंबईच्या विनय दुबे याला अटक झाली. त्यानंतर बुधवारी पनवेलमध्ये पोलीस, महसूल विभाग व पालिका अधिकरी यांच्यात झालेल्या बैठकीत पनवेलमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याच बैठकीत अनेक तलाठ्यांनी समाजमाध्यमांवर कामोठे येथील स्वयंघोषित समाजसेवक कमलेश दुबे व मोहम्मद साजिद शकील अन्सारी या दोघांचे लघुसंदेश उघड केल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाबासाहेब तुपे यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी चित्रफीत बनविणाऱ्यांकडे धान्य मिळत नसल्याने व कुठून आणि कधी आले याबद्दल चौकशी केल्यावर संबंधित व्यक्तीने सरकारी धान्य पुरवठा योजनेचा लाभ घेतला असून स्वयंसेवी संस्थेमार्फत वाटपाचा लाभार्थी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.