ETV Bharat / state

Mumbai Nashik Highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू - मुंबई नाशिक महामार्गावर अपघात

दुचाकीस्वाराने ट्रकला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खरेगाव ब्रिजवरील बॉम्बे ढाब्याच्या पुढे घडली आहे. मुजम्मील बरकतुल्ला शेख (वय,२५) आणि नौशाद आलम निजामुद्दीन अन्सारी (दोघेही रा.लोट्स कॉलनी,गोवंडी-मुंबई ) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत.

Mumbai Nashik Highway Accident
Mumbai Nashik Highway Accident
author img

By

Published : Jul 17, 2022, 8:14 PM IST

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरून दुचाकीने मुंबईतील गोवंडी येथे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार दिलेल्या धडक दिली. यात दुचाकीस्वारासह त्याच्या पाठीमागे बसलेल्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील खरेगाव ब्रिजवरील बॉम्बे ढाब्याच्या पुढे घडली आहे. मुजम्मील बरकतुल्ला शेख (वय,२५) आणि नौशाद आलम निजामुद्दीन अन्सारी ( दोघेही रा.लोट्स कॉलनी, गोवंडी-मुंबई ) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातामुळे एक ते दीड तास वाहतूक कोंडी : मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मुजम्मील आणि नौशाद हे दोघे मित्र असून ते भिवंडीतील भूमीवर्ल्ड संकुलात काम करत होते. दरम्यान १६ जुलै रोजी हे दोघे काम आटोपून रात्रीच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरून त्यांच्या गोवंडी मुंबई येथील घरी जाण्यास निघाले होते. मात्र ते खरेगाव ब्रिजवर आले असता त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र. एम एच.०४ जेके ३४२२ वरील चालकाने जोरात धडक दिली त्यात ते दोघेही खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर अपघातामुळे महामार्गावर एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - Tamil Nadu Violence : हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीचा संशयास्पद मृत्यू.. तामिळनाडूत हिंसाचार भडकला.. बसेस पेटवल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.