नवी मुंबई - सुरक्षा रक्षक बनून तब्बल 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना या दोघांना नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलिसांनी अटक केली आहे. नवीन विश्वकर्मा (31) आणि कामी बी गोरे (36) अशी आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत 22 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
अशी आखली घरफोडीची योजना
नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर 44 मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील जैन कुटुंबीयांच्या फ्लॅटमध्ये चार सुरक्षा रक्षकांनी घरफोडीची योजना आखली होती. बालकृष्ण सोसायटीमध्ये राहणारे जैन कुटुंबीय काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून नंदलाल जैन यांच्या घरी डिलीव्हरी बॉय म्हणून गेलेले आरोपी नवीन रतन विश्वकर्मा आणि कामी भक्ता गोरे असे आरोपीचे नाव आहे. हे मूळ नेपाळ येथील रहिवाशी असून त्यांनी दोन साथीदारांसह जैन यांच्या घरात तब्बल पंचवीस लाखांची चोरी केली. नंदलाल जैन यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार संदीप जैन यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून अवघ्या 24 तासात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम आणि सोने-चांदी अशा एकूण 25 लाख 19 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी 22 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
...म्हणून काढला सीसीटीव्हीचा काढला डीव्हीआर
घरफोडी करणाऱ्या या चारही आरोपीविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. जैन यांची घरफोडी करण्याआधी आणि ओळख पटू नये म्हणून या चारही आरोपींनी सीसीटीव्ही फूटेजचा डीव्हीआरही काढून घेतला आणि नंतर घरफोडी केली. हे चारही आरोपी सुरक्षा रक्षक बनून सोसायटीमधील बंद घरे हेरून घरफोडी करत होते.
दहिसर पुण्यामधून आरोपींना अटक
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय झोन 1 उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्या सुरक्षा रक्षकांना दहिसर आणि पुणे येथून अटक करण्यात आले आहे. नवीन विश्वकर्मा (31) आणि कामी बी गोरे (36) अशी त्यांची नावे आहेत. तर पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा - आता तुमच्याच शब्दात सांगतोय, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत द्या - रावसाहेब दानवे