ETV Bharat / state

Attck on Traffic Police : मद्यपी वाहनचालकाच्या जीवघेण्या हल्यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी - Against drunk drivers

ठाण्यातील माजीवाडा जंक्शन (Thane Majiwada Junction) येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात (Against drunk drivers) कारवाई सुरू असताना मला का पकडले असे म्हणत दारूच्या नशेत चक्क पोलीस कर्मचाऱ्यावर सिमेंट ब्लॉक ने डोक्यात हल्ला केला (Traffic police seriously injured in drunken driver attack) आहे.या प्रकारानंतर जखमी कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्ला करणाऱ्या दोघांवर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Traffic police
वाहतूक पोलिस
author img

By

Published : Mar 21, 2022, 2:59 PM IST

ठाणे: ठाण्यात वाहतूक शाखेची मद्यपी विरोधात कारवाई सुरू असताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव नागनाथ कांदे आहे. तर, अनिल गुप्ता असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस शिपाई नागनाथ कांदे हे वाहतूक शाखेतील कापूरबावडी पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. धूलिवंदन निमित्ताने वाहतूक नियंमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाई करण्यासाठी त्यांची नेमणूक माजीवडा येथे करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री याच भागातून भागीरथ चव्हाण आणि त्याचा मित्र अनिल गुप्ता हे दोघेही दुचाकीवरून जात होते. याचवेळी कांदे यांनी त्यांची दुचाकी अडवून कारवाईस सुरूवात केली. कांदे यांना कारवाई करू नका अशी दोघेही विनंती करत होते. परंतु कांदे यांनी त्यांची विनंती अमान्य केल्याने अनिलने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक घातला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांदे यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, याप्रकरणी चव्हाण आणि गुप्ता यांना राबोडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.