ETV Bharat / state

Danger Building In Thane : ठाण्यातील एकूण ४ हजार २३३ इमारती धोकादायक; मुख्यमंत्र्यांसह माजी मंत्र्यांच्या विभागातच जीर्ण इमारती, नागरिकांचा जीव टांगणीला - धोक्याच्या क्षेत्रात इमारती

ठाणे शहरातील 4 हजार इमारती या धोकेदायक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील अडीच हजार इमारती या डेंजर झोनमध्ये आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळू शकतात.परंतु महापालिकेकडून या इमारतींची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या स्थितीवरुन मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाथ जाधव यांनी सरकारला प्रश्न केला आहे.

ठाणे शहरातील 4 हजार इमारती धोकेदायक
ठाणे शहरातील 4 हजार इमारती धोकेदायक
author img

By

Published : May 29, 2023, 7:47 AM IST

Updated : May 29, 2023, 9:28 AM IST

ठाणे : ठाण्यातील दोन दिग्गज नेत्यांचे बालेकिल्ल्यातील इमारती धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभागांमधील एकूण 4 हजार 233 धोकादायक इमारती डेंजर झोनमध्ये आहेत. या इमारतींपैकी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड याच्या कळवा-मुंब्र्यात 1 हजार 513 इमारती धोकेदायक आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या वागळे इस्टेट कोपरी परिसरातील 1 हजार 534 इतक्या इमारती धोकादायक आहेत. ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी घोषित केली आहे. मात्र या धोकादायक इमारती रिकाम्या कशा करणार? हा मोठा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांनी काय करावे ?असा सवाल ठाणेकर करत आहेत.

मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाथ जाधव

क्लस्टरची योजना कधी सुरू होणार : मागील १० वर्षांपासून फक्त क्लस्टर आला रे आला या घोषणा देऊन निवडणुका लढवल्या गेल्या. लोक मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचली तरी ठाणेकरांचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर आता ठाण्यातून पंतप्रधान होण्याची वाट बघायची का? असा सवाल नागरीक करत आहेत. जितेंद्र आव्हाड हे म्हाडाचे मंत्री होते तरीदेखील त्यांच्या मतदारसंघात हजारोंच्या संख्येने धोकादायक इमारती उभ्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ज्या भागात राहत होते, त्या भागात धोकादायक इमारत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, पण सुधारणा झाली नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा त्याच भागात तीन ते चारवेळा सत्कार झाला. पण कामे मात्र अजून झाली नाहीत, त्यामुळे नागरिकांनी आता इमारतीवरून उडी मारून जीव द्यायचा का? असा सवाल मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे.

इतक्या इमारती आहेत डेंजर झोनमध्ये : महापालिकेकडून नोंदवण्यात आलेल्या यादीमध्ये मुंब्रा प्रभागात 1 हजार 340, वागळे इस्टेटमध्ये 1 हजार 101, दिवा प्रभागात 654 , नौपाडा-कोपरी 433, लोकमान्य- सावरकरनगर 221, कळवा 173, उथळसर 153, माजीवडा मानपाडा 158 इमारती धोकादायक आहेत. तर यंदा सर्वेक्षणामध्ये वर्तकनगरमध्ये एकही धोकादायक इमारत नसल्याचे समोर आले आहे. मुंब्रा आणि वागळे इस्टेट या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती असल्यामुळे या भागातील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळ्यामध्ये या भागात दुर्घटना घडण्याची धास्ती असल्याने नागरिकांच्या मनात असताना ते जीव मुठीत घेऊन या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत.

दुरुस्तीवर आलेल्या इमारती या गटात मोडतात : ठाणे महापालिकेकडून दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. शहरातील या धोकादायक इमारतींची प्रभागनिहाय यादी महापालिकेकडून जाहीर करण्यात येते. अती धोकादायक इमारतींना सी - १ संबोधले जाते. इमारत रिकामी करून दुरूस्ती करण्यायोग्य असेल तर त्याला सी - २ ए. तर इमारतीमध्ये राहून दुरूस्ती करता येण्यासारख्या इमारती सी -२ बी या श्रेणीमध्ये मोडतात. तर चौथ्या प्रकारामध्ये सी - ३ गटातील इमारती किरकोळ दुरूस्ती करून वापरण्यायोग्य असतात.

महापालिकेकडून दुर्लक्ष : पावसाळा जवळ आला की दरवर्षी महापालिकेकडून फक्त सर्वेक्षण केले जाते. मात्र कोणतीही उपाययोजना करताना नागरिकांचे पुनर्वसन केले जात नाही त्यामुळे दरवर्षी धोकादायक इमारत कोसळून नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत त्यांनी ठाणेकरांना मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी या त्रासातून बाहेर काढणे अपेक्षित होते पण तसे होत नाही. तर दुसरीकडे बिल्डर आणि पालिका अधिकारी फक्त मान्सून पूर्वेची वाट बघत असतात का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

नागरीक घर सोडून जाणार कुठे, पालिकेसमोर प्रश्न? : महापालिकेकडून अती धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात येणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. परंतु पावसाळ्याच्या तोंडावर याची अंमलबजावणी करताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ऐन पावसाळ्यात जर नागरिकांना त्याचे राहते घर खाली करण्यास सांगितले तर त्यांनी जायचे कुठे असा प्रश्न नागरिकांना पडणार आहे.

नागरिकांना बेघर होण्यापासून वाचवा : पावसाळा तोंडावर आला की महापालिका प्रशासन धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते. मात्र या इमारतीत राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन काही करत नाही. त्यामुळे पावसाळ्यात इमारत दुर्घटना होऊन निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे ठाणेकर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन तोडगा काढला पाहिजे. या इमारतीतील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात आपले घर सोडून बेघर होण्याआधी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.

हेही वाचा -

  1. BMC Election 2023: मुंबई मनपाच्या निवडणुकीत राजकारण तापणार, ठाकरे गटाला धक्का देण्याकरिता भाजपसह शिंदे गटाकडून नियोजन
  2. Bandra Versova Sea Link : वर्सोवा-वांद्रे सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार; शौर्य पुरस्कारही देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Last Updated : May 29, 2023, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.