ETV Bharat / state

Explosives Seized Bhiwandi : भिवंडीत लाखोंच्या स्फोटकासह तीन जणांना अटक - महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर स्फोटक वाहतूक

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २४ लाखांचे स्फोटकासह तीन जणांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेली स्फोटके
जप्त करण्यात आलेली स्फोटके
author img

By

Published : Feb 2, 2022, 1:35 AM IST

ठाणे - मुंबईसह ठाणे जिह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २४ लाखांचे स्फोटकासह तीन जणांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु केला आहे. अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील (वय ३४ वर्ष), पंकज अच्छेलाल चौहान ( वय २३ वर्ष) समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा (वय २७ वर्ष,) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून तिघेही पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे राहणारे आहेत.

सापळा रचून पकडली आरोपीसह स्फोटके

भिवडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की एका मारूती इको कारमधून काही जण स्फोटक घेऊन येणार आहे. त्यानुसार आज सायंकाळच्या सुमारास भिवंडी वाडा मार्गावरील नदीनाका, पोलीस चौकी समोर सापळा रचला होता. त्यानंतर मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे मारूती इको कार क्रमांक MIH-04/FZ-9200 या कारला थांबवून गाडीत असलेले अल्पेश उर्फ बाल्या, पंकज चौहान, समीर उर्फ सम्या यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष गाडीची पाहणी केली. कारमध्ये जिलेटीनचे बॉक्स ५ त्यामध्ये प्रत्येकी २०० नग, असे एकूण एक हजार आणि एक हजार डीटोनेटरसह मारूती इको कार असा एकूण ४ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल आढळून आला.

बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या मदतीने स्फोटके जप्त

हे स्फोटक बेकारयदेशिररित्या मारूती इको कारमधून जप्त करण्यात आली. तसेच ठाणे येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या मदतीने जप्त केलेली स्फोटके तपासणीसह पंचनामा करून सुरक्षीत रित्या ताब्यात घेतली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये हे स्फोटके आरोपींनी चोरी करुन कोणातरी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे.

आरोपींना करणार न्यायालयात हजर

याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८६ सह भारताचे स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी स्फोटके कोणाला विक्री करणार होते यांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र महापालिका निवडणूक आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्शभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके पकडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर उद्या (मंगळवारी) तिन्ही आरोपीना न्यायलयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा - Rahuri Crime : गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू; हत्या की आत्महत्या? तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.