ETV Bharat / state

सराफ दुकानावरील दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघांना अटक, दोघे फरार

author img

By

Published : Jan 26, 2021, 10:09 PM IST

Updated : Jan 27, 2021, 1:54 AM IST

अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदय नगर येथील भवानी ज्वेलर्समध्ये 10 जानेवारीला भर दुपारी चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालत ज्वेलर्स मालकासह तिघांवर गोळीबार करत चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरोड्यातील मुख्य सुत्रधार व त्यांचा आणखी एक साथीदार फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

आरोपींसह पोलीस पथक
आरोपींसह पोलीस पथक

ठाणे - अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदय नगर येथील भवानी ज्वेलर्समध्ये 10 जानेवारीला भर दुपारी चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालत ज्वेलर्स मालकासह तिघांवर गोळीबार करत चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी तिघांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे.

प्रशांत मोहिते - पोलीस उपायुक्त

या टोळीचा मास्टरमाईंड व त्याचा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मोनू विश्वकर्मा ,धीरज सर्वगोडे ,दिवेश सिंग अशी अटकेत असलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

15 दिवसांत गुन्ह्यातील तीन आरोपींना बेड्या

अंबरनाथमधील सर्वोदय नगर परिसराततील भवानी ज्वेलर्सच्या दुकानात चार जणांनी दरोडा घालत प्रतिकार करणाऱ्या तिघांवर गोळीबार व चाकूने हल्ला केल्याची घटना 10 जानेवारीला भर दिवसा घडली होती. लुटीचा व गोळीबाराचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. हे चौघे सीसीटीव्हीत कैद झाले होते. मात्र, तोंडावर मास्क असल्याने आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. भरदिवसा दहशत माजवणाऱ्या या आरोपीना गजाआड करण्यासाठी आंबरनाथ पोलिसांनी चार पथके नेमली होती. तर गुन्हे शाखाही समांतर तपास करत होती. अखेर 15 दिवसांत या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

मुख्य सुत्रधारा विरोधात 15 हुन अधिक गंभीर

दरोडेखोर मोनू विश्वकर्मा, धीरज सर्वगोडे, दिवेश सिंग यांना पोलिसांनी अटक करून या तिघांकडून पोलिसांनी 5 तोळे सोने हस्तगत केले असून या टोळीचा मास्टरमाइंडसह त्याचा साथीदार, असे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर फरार असलेल्या मुख्य सुत्रधारा विरोधात 15 हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यानी दिली आहे.

हेही वाचा - सीसीटीव्ही : 'त्या' दुकानातील 25 तोळे सोने लुटत अंधाधुंद गोळीबार

Last Updated : Jan 27, 2021, 1:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.