ETV Bharat / state

ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट, 1 हजार कोटींचे कर्ज घेणार - ठाणे पालिका घेणार 1 हजार कोटींचे कर्ज

कोरोनामुळे ठाणे पालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. फक्त 95 कोटी रुपये शिल्लक आहेत. पैशांअभावी नगरसेवकांच्या प्रभागातील कामेही रखडली आहेत. कोरोना काळात पालिकेचा पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे आता पालिका 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. त्यासाठी विचारविनीमय सुरू आहे.

thane
thane
author img

By

Published : Jun 18, 2021, 8:32 PM IST

Updated : Jun 18, 2021, 8:48 PM IST

ठाणे - कोरोनामुळे ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. आताच्या घडीला महापालिकेच्या तिजोरीत फक्त 95 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यात पालिका कर्मचाऱ्यांचा पगारही देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा विचार करत आहे. येत्या काही दिवसात नियोजन करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (18 जून) झालेल्या सर्व साधारण सभेत सांगितले.

भाजप नेते निरंजन डावखरे

एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून कर्ज घेणार

'कोरोनामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे पालिकेचे कंबरडे मोडले आहे. कोविडमुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. एकीकडे कराच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तर, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर कोविडसाठी पैसे खर्च होत आहेत. त्यामुळे येत्या 7 दिवसात 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. यासाठी एमएमआरडीए आणि सिडको यांच्या माध्यमातून हे कर्ज काढण्यात येणार आहे. त्यापद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. तसा विचार देखील केला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक सुरू आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल', असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

निधी अभावी कामे रखडली

प्रभागातील नगरसेवकांची कामे रखडली आहेत. कामाचे सर्व ठराव केले जातील. तसेच नगरसेवकांची नाराजी दूर केली जाईल, असे आश्वासन महापौर म्हस्के यांनी दिले आहे. एकीकडे ठेकेदारांना पैसे देण्यासाठी पालिका तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे कामे रखडले गेली असल्याचे भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. तर खर्चिक प्रकल्पावर होणारा खर्च कमी करावा आणि होणाऱ्या खर्चाचे पैसे पालिकेने वाचवणे गरजेचे आहे, असे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी सांगितले.

अर्थसंकल्प फुगवला

'ठाणे महापलिकेचा वार्षिक अर्थसंकल्प 500 कोटींनी वाढवला आहे. 1 हजार कोटी रुपयांची कामे वाढली आहेत. त्यामुळे मोठा बोजा पालिकेवर पडला आहे. लवकरच निर्णय घेऊन कर्ज काढण्यासंदर्भात विचार केला जाईल', असे महापौर नरेश म्हस्के यांनी सर्व साधारण सभेत नगरसेवकांना सांगितले.

निवडणूक आल्याने कर्जाचा पर्याय

'येत्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी अजून नगरसेवकांना मिळाला नाही. त्यामुळे प्रभागातील कामे रखडली आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कर्ज काढण्याच्या माध्यमातून नगरसेवकांना हा निधी मिळावा', अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे लवकरात लवकर कर्ज काढून नगरसेवकांची सर्व कामे मार्गी लागतील', असे म्हस्के यांनी म्हटले.

हेही वाचा - कर्कश आवाज करणाऱ्या 104 बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोजर, वाहनाच्या काचेवर काळी फिल्म लावणाऱ्यांना दणका

Last Updated : Jun 18, 2021, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.