ETV Bharat / state

Disaster Response Force : मॉन्सूनपूर्व तयारी पूर्ण; पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती प्रतिसाद दल सज्ज

येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आपत्ती प्रतिसाद दल तयार आहे. अनेक भयंकर आपत्तीला ठाणे आपत्ती प्रतिसाद दल हे मदतीसाठी सरसावले आहे.

Disaster Response Force Thane
आपत्ती प्रतिसाद दल
author img

By

Published : Jun 5, 2023, 5:14 PM IST

माहिती देताना आपत्ती प्रतिसाद दलाचे वरिष्ठ जवान

ठाणे : मॉन्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहचला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा आपत्ती उद्भवत असते. पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असून सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. या आपत्तींमध्ये नागरिकांची मदत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 2018 साली ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली. या आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून अनेक मोठे मोठ्या आपत्तींचा सामना करण्यात आला आहे. केवळ ठाणे जिल्ह्यातच नाही तर, ठाणे जिल्ह्याबाहेरील देखील अनेक आपत्तीमध्ये नागरिकांना मदत याच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने केली आहे.

आपत्ती प्रतिसाद दलाचे काम: तळी सारखी भयंकर आपत्तीला देखील, ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल सामोरे गेले होते. भूस्खलन, झाडे कोसळून होणारी आपत्ती यासाठी प्रामुख्याने हे दल कार्यरत असते. विशेष म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस पावसाळ्यात वांगणी या ठिकाणी अडकली होती. यावेळी महालक्ष्मी एक्सप्रेस मधील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये आपत्ती प्रतिसाद दलाचे मोठे योगदान होते. ठाणे आपत्ती प्रतिसाद दल हे अनेक आपत्तींमध्ये नागरिकांची मदतीसाठी सरसावले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा आपत्ती उद्भवत असते. केवळ ठाणे जिल्ह्यातच नाही तर, ठाणे जिल्ह्याबाहेरील देखील अनेक आपत्तीमध्ये नागरिकांची मदत याच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने केली. यंदा देखील पावसाळ्यातील उद्भवणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल सज्ज आहे. - वरिष्ठ जवान सचिन दुबे

यंदा सर्व यंत्रणा सज्ज: पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असते. त्याचप्रमाणे धोकादायक इमारती देखील कोसळतात. या सर्व घटनांमध्ये नागरिक हे आपत्तीमध्ये अडकून राहिल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. याच आपत्ती मधून या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम ठाणे आपत्ती प्रतिसाद दल करते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी सर्व यंत्रणा यंदा देखील सज्ज झाली आहे.

टीडीआरएफचे कार्य: आत्तापर्यंत पंधरा ते वीस वेळा मोगड्रिल देखील आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून करण्यात आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली. तर महाराष्ट्रातीलच अनेक आपत्तींमध्ये ठाण्याची टीडीआरएफ देखील तितक्यात सक्षमतेने कार्य करत असल्याचे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे वरिष्ठ जवान सचिन दुबे यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विभागात राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमा मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
  2. 2. Godavari River गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.