ETV Bharat / state

पावसाने पाठ फिरवल्याने ठाण्यात पाणीकपात सुरू; ठाणेकर चिंताग्रस्त

लांबणीवर गेलेल्या पावसामुळे ठाणेकरांना पुन्हा घामाच्या धारा सुटल्या आहेत. पाऊस गायब झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीकपातीला  सामोरे जावे लागत आहेत.

ठाणे माहानगरपालिकेचे दृष्य
author img

By

Published : Jun 23, 2019, 7:05 PM IST

ठाणे- जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील नागरिक सुखावले होते. मात्र, आता पावसाने पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे ठाणेकरांना पुन्हा घामाच्या धारा सुटल्या आहेत. पाऊस गायब झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहेत.

ठाणे माहानगरपालिकेचे दृष्य

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पहिल्यापासूनच अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत होता. मात्र, पावसाने पाठ फिरवली असल्याने अनेक ठिकाणी एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यातही कमी दाबाने, वेळी-अवेळी, अपुरे पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पालिकेकडून पुरेसे पाणी न आल्यास हौसिंग सोसायट्यांना टँकरचे महागडे पाणी मागवे लागत आहे. जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, आता ही अपेक्षा फोल ठरली असून, पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान जून महिना असूनही गेले १० दिवस अधुनमधून किरकोळ सरी वगळता हवा तसा पाऊस झालेला नाही. उलट कडकडीत उन पडत असल्याने शेतीचे काय होणार असा प्रश्न ठाण्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा उशिरा पोहोचलेल्या पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ३६० मिलिमीटर पावसाने नोंद केली होती. मात्र, यंदा फक्त १६० मिलिमीटरच पावसाची नोंद झाले असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान लांबणीवर गेलेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली आहे.

Intro:ठाण्यातून पाऊस गायब : चिंता वाढली
तर काही ठिकाणी पाणी कपातीचे सत्र सुरूचBody:

जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ठाण्यात पावसाने पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसाने ठाणेकरांना पुन्हा घामाच्या धारा सुटल्या आहेत. पाऊस गायब झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी पाणीकपातीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पहिल्यापासूनच अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत असून, अनेक ठिकाणी एक दिवस आड पाणी पुरवठा होतो. त्यातही कमी दाबाने, वेळी-अवेळी, अपुरे पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पालिकेकडून पुरेसे पाणी न आल्यास हौसिंग सोसायट्यांना टँकरचे महागडे पाणी मागवावे लागते. जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, आता ही अपेक्षा फोल ठरली असून, पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान जून महिना असूनही गेले 10 दिवस अधुनमधून किरकोळ सरी वगळता हवा तसा पाऊस झालेला नाही. उलट कडकडती उन पडत असल्याने शेतीचे काय होणार असा प्रश्न ठाण्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

दरवर्षी जून च्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते, मात्र यंदा उशिरा पोहचलेल्या पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत 360 मिलिमीटर पावसाने नोंद केली होती, मात्र यंदा फक्त 160 मिलिमीटर पावसाने नोंद केली असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान लांबणीवर गेलेल्या पावसाने नागरिकांच्या मनात चिंता वाढवली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.