ETV Bharat / state

भटक्या कुत्राच्या हल्ल्यात ७ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू तर २ मुले जखमी - bhivandi

२६ जूनला पियुष आणि अर्णव हे दोघे घराबाहेर खेळत असताना अचानक  पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोघांवर हल्ला केला. मात्र, उपचार सुरू असतानाच अर्णवचे काल बुधवारी सायंकाळी निधन झाले.

भटक्या कुत्राच्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
author img

By

Published : Jul 18, 2019, 8:12 PM IST

ठाणे - पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ७ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर २ बालके गंभीर जखमी आहेत. हा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावात घडला. अर्णव प्रमोद पाटील (७) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव असून पियुष मनोज पाटील (८) आणि निहान पप्पू म्हात्रे (९) जखमी झालेल्या बलकांची नावे आहेत.

२६ जूनला पियुष आणि अर्णव हे दोघे घराबाहेर खेळत असताना अचानक पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोघांवर हल्ला केला; हल्ल्यात अर्णवच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. याआगोदर त्याच कुत्र्याने २५ जूनला निहानवर हल्ला करून चावा घेतला होता. सुरुवातीला तिघांवर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, अर्णवची प्रकृती खालवल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अर्णवचे काल बुधवारी सायंकाळी निधन झाले. घटनेने हायवे दिवे गावात शोककळा पसरली असून सतर्कता म्हणून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी असलेल्या पियुष आणि निहान या दोघांना गुरुवारी जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:भटक्या कुत्राच्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू बालक गंभीर

ठाणे : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात वर्षे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे ही घटना भिवंडी तालुक्यातील हायवे गावात घडली आहे अर्णव प्रमोद पाटील असे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे तर पियुष मनोज पाटील वय 8 आणि निहान पप्पू म्हात्रे वय 9 असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत,
भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावात मृतक अर्णव हा आई-वडिलांचा राहत होता , 25 जून रोजी निहान याच कुत्र्याने हल्ला करून त्याला चावा घेतला, तर 26 जून ला पियुष आणि अर्णव हे दोघे घराबाहेर खेळत असताना अचानक त्याच पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने या दोघांवर हल्ला केला , या हल्ल्यात मृतक अर्णव याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती, या तिघांवर सुरुवातीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले , मात्र अर्णव याची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले होते , मात्र उपचार सुरू असतानाच अर्णव याचे काल सायंकाळच्या सुमारास निधन झाले, या घटनेने हायवे दिवे गावात शोककळा पसरली असून सतर्कता म्हणून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी असलेल्या पियुष आणि निहान या दोघांना गुरुवारी जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.