ठाणे - सिटीस्कॅनसाठी आलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर टेक्निशियनने रुग्णालयातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात टेक्निशियनविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. जिन्स थॉमस (२४) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हानसागर शहरातील सर्वानंद रुग्णालयात ३५ वर्षीय महिला सिटीस्कॅन करण्यासाठी आली होती. त्यावेळी सिटीस्कॅन करणाऱ्या जिन्स थॉमस या टेक्निशियनने सदर महिलेशी लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन विकृत थॉमस याच्याविरूध्द तक्रार दाखल केली.
हेही वाचा - भिवंडी महापालिकेच्या तिजोरीची चावी काँग्रेसकडे
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी थॉमस याच्याविरूध्द लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास व.पो.नि. राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कौराती करत आहेत.
हेही वाचा - चिमुरडीवर बलात्कार करून खून; आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी