ठाणे : बदलत्या हवामानामुळे विषारी, बिन विषारी साप भक्ष्यासह उब मिळावी म्हणून मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली (Cobra snake in Thane) आहे. पुन्हा एक विषारी कोब्रा नाग भक्ष्याच्या शोधात सोसायटीच्या इमारतीत शिरून दरवाजात फणा काढून बसल्याने रहिवाशांची वाट अडवल्याने एकच घबराट पसरली होती. तर तेलाचा घाणा असलेल्या कारखान्यात ७ फुटांचा साप शिरल्याने कामगारासह मालकाने कारखान्याबाहेर पळ काढला होता.
रहिवाशांमध्ये एकच घबराट : विषारी बिन विषारी साप थंडीच्या दिवसात उब मिळावी, तसेच भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. आजही मानवी वस्तीत साप शिरल्याच्या पुन्हा तीन घटना आहे. पहिल्या घटनेत कल्याण पश्चिम भागातील नीलकंठ सोसायटीत घडली असून या सोसायटीच्या एका इमारतीच्या मुख्य प्रवेश दारातून कोब्रा नाग भक्ष्याच्या शोधात शिरला होता. मात्र त्याला भक्ष्य मिळाले नसल्याने तो तळ मजल्यावरील एका दारात फणा काढून बसला होता. या कोब्रा नागाकडे एका महिलेचे लक्ष जाताच, तिने रहिवाशांना नाग सोसायटीत शिरल्याची माहिती दिली. रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. त्यानंतर विद्या कामात यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून सोसायटीत नाग असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी येऊन त्यांनी फणा काढून बसलेल्या कोब्रा नागाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. कोब्रा नाग पडकल्याच पाहून रहिवाशांनी सुटेकचा निश्वास घेतला. हा कोब्रा नाग साडे फूट लांबीचा असून अंत्यत विषारी असल्याचे सर्पमित्राने (Cobra snake rampage in Thane) सांगितले.
साप भक्ष्याच्या शोधात : दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिम भागात तेला घाणा असलेल्या कारखान्यात ७ फुटाचा साप आज दुपारी भक्ष्याच्या शोधात शिरला होता. मात्र एका कामगाराला हा साप तेलाचा घाणा असलेल्या अडगळीत जागेत दिसताच, त्याने साप साप ओरडत कारखान्या बाहेर धूम ठोकल्याने मालकासह इतरही कामगारांनी बाहेर पळ काढला. त्यानंतर कारखान्याचे मालक अनंत पाटील यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून तेलाच्या घाणा असलेल्या जागेत साप दडून बसल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता घटनास्थळी पोहचुन या सापाला कारखान्यातील अडगळीत जागेतुन पकडून पकडून पिशवीत बंद केले. साप पडकल्याचे पाहून मालकासह कामगारांनी सुटेकचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा (snake rampage in Thane) आहे.
मानवी वस्तीत साप : दरम्यान या दोन्ही सापांना कल्याण वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आज सायंकाळी जंगलात सोडण्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली आहे. तसेच हवामानात बदल होत असल्याने मानवी वस्तीत साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रांना संर्पक करण्याचे आवाहन सर्पमित्र दत्ता यांनी नागरिकांना केले (Cobra snake) आहे.