नवी मुंबई - पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाची सरुवात सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात झाली. यावेळी शंकर महादेवन हे चक्क एक दिवसासाठी वाहतूक पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळाले.
रस्ते अपघातात कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे, यामुळे पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येतेय, पोलीस आपल्या परीने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात अनेक दिग्जज व्यक्ती देखील समाविष्ट होत आहेत. नवी मुंबईमध्ये आज सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनीही नवी मुंबईतील रहिवासी म्हणून आपला या उपक्रमात सक्रिय सहभाग म्हणून चक्क एक दिवसासाठी ते वाहतूक पोलीस बनले व रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियम, रस्ते सुरक्षा, वाहतुकीची दिशा याबद्दल जनजागृती देखील केली. यावेळी त्यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या महाभागांंना दंड देखील आकारला.