मुंबई - ऐ 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से, अशा शब्दांत काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे. मामी बद्दल काय बोलायचे, फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. अन्यथा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे स्वप्नच राहील, असा इशारा देत सय्यद यांनी अमृता फडणवीसांना ( Dipali Sayyed Criticized Amruta Fadnavis ) फटकारले आहे. त्या कल्याणमध्ये बोलत होत्या.
दिपाली सय्यद म्हणाल्या की, मुख्यमंत्र्याची खुर्ची गेल्यावर भाजपकडून राष्ट्रपती राजवटीसाठीच कुठल्याही थराचे 'राज'कारण राज्यात सुरु केले आहे. त्यामध्ये जातपात, हिंदू मुस्लिम दंगली, असे प्रकार घडविण्याचे राज्यात भाजपकडून सुरु आहे. त्यातूनच मुख्यमंत्री पद पुन्हा मिळावे, असे धोरण त्यांचे आहे. मात्र, हे राज्य सर्वधर्माच्या लोकांचे आहे. दंगली झाल्या, तर त्यामध्ये सर्वाधिक सामान्य नागरिक भरडला जातो. त्यामुळे सर्वांनी शांतात पाळावी, आवाहनही सय्यद यांनी केले आहे.
राज ठाकरे बाबत बोलताना त्यांनी म्हटले की, आज होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला माझ्या शुभेच्छा आहे. राज ठाकरेंनी भोगांवरून जे राजकारण सुरु केले. यापूर्वी त्यांना आजपर्यत कधीच विजय मिळवता आला नाही. किमान आता तरी त्यांना विजय मिळो, म्हणत राज ठाकरेंना दिपाली सय्यद यांनी चिमटा काढला आहे.
हेही वाचा - Nana Patole : मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपची ‘बुस्टर सभा’; नाना पटोलेंची टीका