ETV Bharat / state

School Reopen in Thane : ठाणे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या ९८७ शाळांची घंटा वाजणार - ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा

शासनाने निर्गमित केलेल्या कोविडच्या नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे (School Reopen in Thane District) पहिली ते चौथीचे वर्ग आणि नगरपंचायत, नगर परिषदेचे पहिले ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार आहेत.

School Reopen in Thane
School Reopen in Thane
author img

By

Published : Dec 14, 2021, 9:10 PM IST

ठाणे - शासनाने निर्गमित केलेल्या कोविडच्या नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून ग्रामीण (School Reopen in Thane District) भागातील जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथीचे वर्ग आणि नगरपंचायत, नगर परिषदेचे पहिले ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार (School Reopen in Thane) आहेत. हे वर्ग जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मान्यतेने सुरु होत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.

सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करूनच शाळा सुरू..

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे ग्रामीण भागातील पहिले ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरु (School Reopen in Thane) करताना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथीच्या ९८७ शाळा मंगळवारपासून सुरु होणार आहेत. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसारच वर्ग सुरु करताना शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांची कोविड चाचणी आणि लसीकरण करणे, विद्यार्थी बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थांमध्ये किमान 6 फुट अंतर ठेवणे, गर्दी जमेल असा शालेय कार्यक्रम न करणे आदी सूचनांचे पालन करण्याचे निर्देश बडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

हे ही वाचा - Varsha Gaikwad On Schools : मुंबई-पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार का ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात..

शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण..

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून व्यापक स्वरुपात लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण सत्राचेही आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थांची सर्व खबरदारी घेऊनच शाळा सुरु होणार असल्याचे बडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.