ठाणे - हॉटेलमधील काम संपवून कॅप्टन पॅगमायुंग वुगंचान हे त्यांचे घरी रिक्षाने जात होते. यावेळी रिक्षाचालकासह चौघा अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांचे मोबाईल आणि बॅग जबरीने हिसकावून नेली. या घटनेत पॅगमायुंग हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-भाजपच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील - गिरिश महाजन
१६ सप्टेंबरला रात्री दीडच्या सुमारास ठाण्यातील वाघबीळनाका येथे प्रीतमग्लोबेलमध्ये कॅप्टन असलेले पॅगमायुंग वुगंचान हे त्यांचे हॉटेलमधील काम संपवून घरी निघाले होते. वाघबिळनाका येथून ऑटो रिक्षा थांबवून ते रिक्षात बसले. या रिक्षामध्ये ड्रायव्हरसह चौघेजण बसले होते. रिक्षा चालकाने लघवीच्या निमित्ताने रिक्षा वेदांत हॉस्पिटल ते ओवळा दरम्यान थांबवला. यावेळी सर्वजन रिक्षातून उतरले. रिक्षा चालकाने त्याच्या इतर साथीदारांना इशारा दिला, "इसने दारू पिया इसको मारो" अशी खोटी बतावणी करीत चौघांनी पॅगमायुंग यांच्या पॅन्टमधून ५ हजार किमतीचा मोबाइल, २०० रुपयाची बॅग, असा एकूण ५ हजार २०० किंमतीचे साहित्य हिसकावले. दरम्यान, एकाने कोणत्यातरी टोकदार हत्याराने पॅगमायुंग यांच्यावर वार करुन सगळे फरार झाले.