ETV Bharat / state

Building Collapsed In Bhiwandi: इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० तासानंतर सुटका, बचाव पथकाने जन्मदिनीच दिले 'जीवदान' - सुनील पिसाळ

भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत एका ४० वर्षीय व्यक्तीला त्याच्या जन्मदिनीढिगाऱ्याखालून २० तासानंतर बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. त्याला पुन्हा जीवदान दिले आहे. सुनील पिसाळ असे ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Bhiwandi building disaster
भिवंडी इमारत दुर्घटना
author img

By

Published : Apr 30, 2023, 1:52 PM IST

ढिगाऱ्याखालून शेवटचा व्यक्ती बाहेर निघेपर्यंत शोध मोहीम सुरू ठेवणार -कमांडर दीपक तिवारी

ठाणे : भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तीन मजली इमारत शुक्रवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत २२ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत तेरा जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांनी यश आहे. तर या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीस तास उलटूनही घटनास्थळी मदत व शोधकार्य सुरू आहे. गोदामात हमालीचे काम करणाऱ्या सुनील पिसाळ याला आज सकाळी वीस तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश मिळाले आहे.

इमारतीमधील गोदामात हमालीचे काम : सुनील हा भिवंडी शहरातील फुले नगरमध्ये राहत आहे. कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील गोदामात हमालीचे काम करतो. घटनेच्या दिवशीही नेहमीप्रमाणे तो गोदामात काम करत असतानाच अचानक इमारत पडत असल्याचे त्याला जाणवले. त्यानंतर तातडीने जीव वाचविण्यासाठी त्याने गोदामातील जाड काचेच्या भेगेत जाऊन बसल्याने त्याच्या अंगावर मलबा पडून तो जाड काचेच्या भेगेत अडकून पडला.

बचावासाठी बाहेर पडण्याचा मार्ग : २० तास अन्न पाणीविना तो बचावासाठी बाहेर पडण्याचा मार्ग शोध होता. मात्र त्याला ते जमले नाही. आज मात्र सकाळी एनडीआरएफचे पथक काम करत असताना त्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे तो जिवंत असल्याचे समजताच त्याच्यासाठी रात्रभर जागून काढलेल्या नातेवाईक आणि मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कारण त्याचा आज वाढदिवस होता. त्याला ज्या वेळी ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. त्याने सर्वात आदी एनडीआरएफ जवानांना हात जोडले.

जीवनदान मिळाल्याची प्रतिक्रिया : दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही 7 ते 8 व्यक्ती अडकल्याची माहिती मिळत आहे. त्या दिशेने शोधकार्य केले जात आहे. विशेष म्हणजे 20 तासानंतर जिवंत बाहेर काढलेल्या सुनील या व्यक्तीचा वाढदिवस आजच आहे. त्यामुळे त्याला वाढदिवसाच्या दिवशी जीवनदान मिळाल्याची प्रतिक्रिया एनडीआरएफ कमांडर दीपक तिवारी यांनी दिली आहे. तर ढिगाऱ्याखालून जोपर्यंत शेवटचा व्यक्ती बाहेर निघत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शोध मोहीम सुरू ठेवणार आहे. अडकलेल्या व्यक्तीला जिवंत कसा काढता येईल, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे, असे एनडीआरएफचे कमांडर दीपक तिवारी यांनी सांगितले.

हेही वाचा : Building Collapsed In Bhiwandi : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.