ETV Bharat / state

Shinde BJP Controversy : शिंदे-भाजपमधील वादाबद्दल भाजप मंत्र्यांनी बोलणे टाळले

गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून स्थानिक शिंदे भाजप गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन वाद मिटल्याचे जाहीर केले. आता रविवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Shinde BJP Controversy
Shinde BJP Controversy
author img

By

Published : Jun 24, 2023, 8:02 PM IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून स्थानिक शिंदे-भाजप गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मिटला आहे. या मुद्द्यावर वार्तांकन करताना पत्रकारांनी भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांना शिंदे आणि भाजपमधील वादाबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, वाद काय होता आणि काय मिटले हे मला माहीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने देशभरातील प्रत्येक एनडीए उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अनेक वर्षांपासून धडपडत आहे, असे उत्तर देऊन शिंदे गटाच्या वादावर भाजपने अधिक बोलणे टाळल्याचे दिसून येत आहे.

जाहीर सभेचे आयोजन : मोदी@9 जनसंपर्क मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्रीय नेतृत्वाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भाजपच्या वतीने रविवारी दुपारी चार वाजता अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. कल्याण लोकसभेतील सहा विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद असलेल्या बूथवरून या जाहीर सभेला कार्यकर्ते येणे अपेक्षित आहे.

भाजपची प्रचंड मेहनत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी घर चलो अभियान हे 10 जुलैपर्यंत आम्हाला करायचे आहे. प्रत्येकजण हॅण्डबिल घेऊन प्रत्येक कार्यकर्ता घराघरामध्ये जाणार आहेत. नऊ वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी काम जनतेसाठी केले, त्याची माहिती देणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोणत्या भागात कशा पद्धतीने संपर्क करावा.

शिंदेंच्या बंडखोरीवर बोलणे टाळले : या सगळ्या गोष्टी गेल्या पूर्ण महिनाभरामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचे अंतिम स्वरूपामध्ये फळ कसे मिळाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम केंद्राकडून आला. त्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे खऱ्या अर्थाने ही जनसभा घेऊन जाणार असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ऑपरेशन लोटस ते शिंदेंची बंडखोरीचे साक्षीदार असलेले डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ऑपरेशन लोटस ते शिंदेंची बंडखोरी यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी भारत माता कि जय म्हणून बोलणे टाळत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

हेही वाचा - PM Care Fund Scam : पीएम केअर फंडाचा निधी गेला कुठे.? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.