ठाणे - काही दिवसांपुर्वी महानगरपालिकेच्या शाळेत हॅन्डवॉशच्या वादग्रस्त प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी पक्षाने आंदोलन केले होते. आता नव्याने शिक्षण विभागात कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मांडण्यात आले आहे. याविरोधात देखील नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी पक्षाच्या वतीने तक्रार पेटी आणि प्रातिनिधिक नोटा आणून हे आंदोलन करण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात स्वाभिमानी पक्ष पुन्हा आक्रमक
काही दिवसांपुर्वी महानगरपालिकेच्या शाळेत हॅन्डवॉशच्या वादग्रस्त प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी पक्षाने आंदोलन केले होते. आता नव्याने शिक्षण विभागात कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मांडण्यात आले असून याविरोधात देखील स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत.
ठाणे - काही दिवसांपुर्वी महानगरपालिकेच्या शाळेत हॅन्डवॉशच्या वादग्रस्त प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी पक्षाने आंदोलन केले होते. आता नव्याने शिक्षण विभागात कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मांडण्यात आले आहे. याविरोधात देखील नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी पक्षाच्या वतीने तक्रार पेटी आणि प्रातिनिधिक नोटा आणून हे आंदोलन करण्यात आले.
Body:
ठाणे महापालिकांच्या शाळेत हॅन्डवॉशचा वादग्रस्त प्रस्तावाच्या विरोधात स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आल्यानंतर आता नव्याने शिक्षण विभागात कोट्यवधीचे वादग्रस्त प्रस्ताव आणण्यात आले असून याविरोधात देखील स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. ठाणे महापालिकेच्या बाहेर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत . शाळेत बसवण्यात येणाऱ्या तक्रार पेटीच्या प्रस्ताव वादग्रस्त असून यामध्ये मोठा भ्र्रष्टाचार असल्याचा यारोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे . एकीकडे पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना सध्या मूलभूत सुविधा नसताना दुसरीकडे तक्रार पेटीच आणि अशा प्रकारचे कोट्यवधीचे प्रस्ताव आणून शिक्षण विभागात विकासाच्या भ्रष्टाचार सुरु असून गेल्या ३ वर्षात आणलेल्या सर्व प्रस्तावाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने कोट्यवधींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अमराठी मुलांसाठी निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, मोबाइल लायब्ररी, दफ्तारचे ओझे कमी करणारा प्रस्ताव आणि विशेष करून पालिका शाळेत तक्रार पेटी बसवण्याच्या प्रस्तावावरूपेटी न चांगलाच वादंग झाला तक्रार आहे .पालिका शाळांमध्ये ज्या तक्रार पेटीची बसवण्यात येणार आहे त्यांची मार्केमध्ये किंमत अडीज हजार असताना या प्रस्तावामध्ये मात्र १३ ते १५ हजार किंमत लावण्यात आली आहे . त्यामुळे विकासाच्या नावावर हा मोठ्या भ्रष्टाचार असून विकासा च्या नावावर भ्र्रष्टाचार करण्यापेक्षा सरळ पैसे खावे असा टोला पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी लगावला आहे .
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी पक्षाच्या वतीने तक्रार पेटी आणि प्रातिनिधिक नोटा आणून हे आंदोलन करण्यात आले . हे प्रस्ताव मागे घेण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्रिपाठी यांनी दिला आहे .
Byte विजय त्रिपाठी स्वाभिमान पक्ष नेतेConclusion: