ETV Bharat / state

चर्चा तर होणारच! 8 कोटीची रोल्स रॉईस घेणाऱ्यावर 34 हजाराच्या वीज चोरीचा गुन्हा

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी 8 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत कल्याण विभागाच्या महावितरणने त्यांच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला.

संजय गायकवाड
संजय गायकवाड
author img

By

Published : Jul 13, 2021, 4:58 PM IST

ठाणे - कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी 8 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत कल्याण विभागाच्या महावितरणने त्यांच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला. यामुळे कल्याणात एकच या गुन्ह्याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

34 हजाराच्या वीज चोरीचा गुन्हा

बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप -

गायकवाड यांच्यावर सुमारे 34 हजार 640 रुपये वीज चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रकमेची भरणा केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तर याप्रकरणी संजय गायकवाड यांनी मात्र हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जर वीज चोरी झाली आहे, तर तर मग वीज मीटर का नेले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोल्स रॉईस कार
रोल्स रॉईस कार

अब्रुनुकसानीचा दावा करणार -

वीज चोरी नसून तडजोडीचे बिल होते. मीटरचा एक फेज जळाल्याने महावितरणचे अधिकरी साईड व्हीजीट करण्यास आले होते. मीटरचा एक फेज बायपास असल्याचे त्यांचा निदर्शनास आले म्हणून महावितरणकडून तडजोडीचे बिल आकारण्यात आलं. परंतु बिल आम्हाला मिळालं नव्हतं. माझी नाहक बदनामी केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय होता प्रकार?

महावितरणच्या भरारी पथकाने कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. मार्चमध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रीतसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे 34 हजार 840 रुपयांचे देयक व 15 हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने महावितरणने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे 34 हजार 840 रुपयांचे देयक व तडजोडीची 15 हजार रुपयांची रक्कम त्यांनी सोमवारी महावितरणकडे भरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.