ETV Bharat / state

'एक खोका दे, नाहीतर ठार मारीन, व्यापाऱ्याला धमकावणारा कुख्यात गुंड गजाआड

author img

By

Published : Mar 11, 2020, 4:31 PM IST

उल्हासनगर मधील व्यापारी नरेश साजनदास रोहरा यांना 4 जानेवारीला 1 कोटी रुपयांची खंडणी मागुन ती नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी दीपक सोंडेसह त्याच्या चार अज्ञात साथीदारांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली होती.

police-arrested-criminal-in-thane
ठाण्यातील कुख्यात गुंड गजाआड

ठाणे- 'एक खोका दे, नाहीतर तुला ठार मारीन,' अशी धमकी एका कुख्यात गुंडाने शहरातील एका व्यापाऱ्याला दिली होती. अखेर हिललाईन पोलिसांनी दोन महिन्यानंतर त्या कुख्यात गुंडाला गजाआड केले आहे. विशेष म्हणजे हा गुंड भाजप नगरसेविकेचा पती असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दीपक सोंडेने असे त्याचे नाव आहे.

ठाण्यातील कुख्यात गुंड गजाआड

हेही वाचा- दिल्ली हिंसाचार: ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

उल्हासनगर मधील व्यापारी नरेश साजनदास रोहरा (वय ४०,रा.आशाळेगाव उल्हानसागर) यांना 4 जानेवारीला 1 कोटी रुपयांची खंडणी मागुन ती नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी दीपक सोंडेसह त्याच्या चार अज्ञात साथीदारांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली होती. उल्हासनगरात दीपक सोंडेचे गुन्हेगारी क्षेत्रात नाव असून यापूर्वी त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मध्यंतरी काही काळ गॅंगस्टर सुरेश पुजारीने उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, परिसरातील व्यापाऱ्यांकडून खंडणीचे सत्र सुरू केले होते. मात्र, खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर असल्याने त्याने तूर्तास तरी खंडणीसाठी व्यापाऱ्नायांना धमकी दिल्याचे समोर आले नव्हते. मात्र, दीपक सोंडेने पुन्हा उल्हानसागरातील व्यापाऱ्याकडे 1 कोटींची खंडणी मागणी करुन न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. 4 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास व्यापारी नरेश साजनदास रोहरा हे 5 नंबर परिसरातील त्यांच्या कार्यलयासमोर उभे असताना4 साथीदारांना पाठवून सोंडेने ही धमकी दिली होती. त्यांनतर त्याच दिवशी दीपक सोंडेने मोबाईलवर संपर्क करुन मला 1 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी विचारणा करुन न दिल्यास ठार मारील, अशी धमकी दिली. यामुळे भयभीत झालेल्या नरेश यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सोंडे फरार झाला होता.

या दोन महिन्याच्या कालावधीत पोलिसांची तीन ते चार पथके त्याचा शोध घते होती. अखेर आज हिललाईन पोलिसांनी त्याला गजाआड करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावणावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.