ठाणे : राजेंद्रनगर-कुर्ला पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ठाकुर्ली-डोंबिवली दरम्यान बिघाड झाला होता. यामुळे रेल्वे प्रशासनाने जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवली होती. या बदलामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विसकळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
हेही वाचा - 'शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या?'
अखेर दुपारी बारा वाजताच्या सुमारास दुसरे इंजिन जोडून पटना एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली. मात्र, दुपारपर्यत या मार्गावर वाहतूक उशिराने सुरू असल्याने मध्य रेल्वेचे लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे प्रवाशांचा विविध स्थानकांवर खोळंबा झाला. बराच वेळ उलटूनही लोकल जागेवरून हलत नसल्याने अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून पायी चालणे पसंत केले.
हेही वाचा - पाथरीच्या साईबाबा मंदिरात सर्वपक्षीय महाआरती; साईभक्तांचा लोटला जनसागर