ETV Bharat / state

भिवंडीत बैल चोरणाऱ्या त्रिकुटाला जमावाची बेदम मारहाण, एकाचा मृत्यू - Bhiwandi latest news

जमावाने बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या नफीस कुरेशी यास उपचारासाठी काही नागरिकांनी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

Bhiwandi
भिवंडी
author img

By

Published : Feb 2, 2020, 8:50 AM IST

ठाणे - शेतकऱ्याच्या अंगणातून बैल चोरुन तो बोलेरो जीपमधून घेऊन जाणाऱ्या कसायांच्या त्रिकुटाला जमावाने पकडून बेदम चोप दिल्याची घटना घडली. या मारहाणीत एका कसायाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आहे. ही घटना भिवंडी - पारोळ रोडवरील खडकी ब्रिजवर घडली आहे.

नफीस कुरेशी (वय 28, रा. कसाईवाडा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या कसायाचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात जमावावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बैल चोरणाऱ्या कसायांच्या टोळीवरही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२० : प्रभाग रचनेचे प्रारूप आणि आरक्षणाची सोडत जाहीर

याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी तालुक्यातील भुईशेत येथील शेतकरी प्रकाश नवश्या डोंबरे यांच्या अंगणात बांधून ठेवलेला बैल मध्यरात्री चोरण्याचा प्रयत्न झाला. मृत नफीस कुरेशी, साथीदार आकिब जावेद आलम अंसारी( 20 रा. गुलजार नगर) व अमीर शकील खान (23 रा. ईदगाह रोड) यांनी हा बैल बोलेरो जीपमधून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी पाड्यावरील नागरिकांना याची कुणकूण लागताच त्यांनी बोलेरो जीपचा पाठलाग करून खडकी पुलावर या तीनही कसायांना बेदम मारहाण केली.

या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तिघा कसायांच्या विरोधात तर नफीस अंसारी याच्या मृत्यू प्रकरणी जमावाच्या विरोधात खुनाचा गुन्हा असे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

हेही वाचा - माघी गणेशोत्सवातील पुजेच्या जेवणातून १५ हून अधिक जणांना विषबाधा

Intro:kit 319Body: बैल चोरणाऱ्या कसाईच्या त्रिकुटाला जमावाकडून बेदम मारहाण ; एकाचा मृत्यू

ठाणे : शेतकऱ्याच्या अंगणातून बैल चोरुन तो बोलेरो जीपमधून घेऊन जाणाऱ्या कसाईंच्या त्रिकुटाला जमावाने पकडून बेदम चोप दिल्याने या मारहाणीत एका कसाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
हि घटना भिवंडी - पारोळ रोडवरील खडकी ब्रिजवर घडली आहे. नफीस कुरेशी ( २८ रा.कसाईवाडा ) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या कसाईचे नांव आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात जमावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर बैल चोरणाऱ्या कसाईच्या टोळीवरही गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी तालुक्यातील भुईशेत येथील शेतकरी प्रकाश नवश्या डोंबरे यांच्या अंगणात बांधून ठेवलेला बैल मध्यरात्री बोलेरो जीपमध्ये भरून तो चोरून नेण्याचा प्रयत्न मृतक नफिस त्याचे साथीदार आकिब जावेद आलम अंसारी ( २० रा. गुलजार नगर ) व अमीर शकील खान ( २३ रा.ईदगाह रोड ) आदींच्या साथीने बैल चोरून घेऊन जात असल्याची कुणकूण आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना मिळताच, त्यांनी बोलेरो जीपचा पाठलाग करून खडकी ब्रिजवर अडवून जीपच्या काचा फोडून या तिघा कसाईंना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी जमावाने बेदम मारहाण केल्याने या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नफीस कुरेशी यास उपचारासाठी काही नागरिकांनी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तिघा कसाईंच्या विरोधात तर नफीस अंसारी याच्या मृत्यू प्रकरणी जमावाच्या विरोधात खूनाचा गुन्हा असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून वपोनि.राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.