ETV Bharat / state

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये अमानुष मारहाणीत एकाचा मृत्यू; गुन्हेगारीत वाढ - One killed in beating mira bhayandar news

शनिवारी सकाळी भाईंदर पूर्वेच्या इंदिरा नगरच्या समोर असलेल्या मीरा भाईंदर मनपाच्या मैदानात काही नागरिक फिरत असताना त्यांना सदर मृतदेह दिसला. त्यांनतर नवघर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली.

one died in beating in mira bhayandar
मीरा भाईंदरमध्ये अमानुष मारहाणीत एकाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 6, 2021, 9:58 PM IST

Updated : Mar 6, 2021, 10:33 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही मीरा भाईंदर परिसरातील गुन्हेगारीत वाढ होत असताना दिसून येत आहे. भाईंदर पूर्व इंदिरा नगर परिसरातील चोर समजुन दोन युवकांना मारहाण करण्यात आली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे जवळपास ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली.

पोलीस आयुक्त अमित काळे याबाबत माहिती देताना.

चोर समजून अमानुषपणे मारहाण -

शनिवारी सकाळी भाईंदर पूर्वेच्या इंदिरा नगरच्या समोर असलेल्या मीरा भाईंदर मनपाच्या मैदानात काही नागरिक फिरत असताना त्यांना सदर मृतदेह दिसला. त्यांनतर नवघर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यावर नवघर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मारहाण करणाऱ्या जवळ ७ ते ८ संशयित युवकांना ताब्यात घेण्यात आले. तर चार आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहे.

हेही वाचा - मुंबईत आज 1 हजार 188 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

पोलीस आयुक्तालय नंतर गुन्हेगारी मध्ये वाढ -

मीरा भाईंदर शहरात पोलीस आयुक्तालय नव्याने सुरू झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत असताना शहरातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यापूर्वी मीरारोड मधील असलेल्या एस. कुमार ज्वेलर्सचा दुकान भरदिवसात बंदुकीच्या धाक दाखवून लुटण्यात आले होते. तर नयानगर पोलीस ठाण्यातून एक आरोपी पसार झाला होता. भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामूहिक बलात्कार आणि नवघर पोलीस ठाणे हद्दीतील बंदुकीचा धाक दाखवून लूट आणि हत्याची घटना घडली आहे. या घडलेल्या गुन्हेगारी घटनामध्ये पोलिसांना काही गुन्हे उघडकीस आणण्यात यशही मिळालेली आहे. मात्र, पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा - अमरावतीत लॉकडाऊन शिथिल; सर्व दुकाने उघडली, भीती मात्र कायम

Last Updated : Mar 6, 2021, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.