ETV Bharat / state

अंबरनाथ शहरातील 'त्या' कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू - death due to corona

अंभरनाथ शहरातील ५० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार घेत होते

अंबरनाथ शहरातील 'त्या' कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

author img

By

Published : Apr 7, 2020, 8:23 AM IST

ठाणे - अंबरनाथ शहरातील कोरोनाची लागण झालेल्या ५० वर्षीय रुग्णावर मुंबईच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला आहे.

हा मृतक व्यक्ती १० मार्च रोजी उत्तर प्रदेशला एका कार्यक्रमानिमित्त गेला होता. तिथून तो १८ मार्चला अंबरनाथला आला. त्यानंतर या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याने अंबरनाथ मधील दोन खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, तात्पुरते बरे वाटल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले. इथे उपचार सुरू असताना त्याची कोरोना तपासणी करण्यात आली असता २ एप्रिल रोजीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर त्याला मुंबईच्या भाभा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा रुग्ण उच्च मधुमेह आणि हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे हा रुग्ण जरी कोरोना पॉझिटिवह असला तरी त्याचा मृत्यू हा नक्की कोणत्या कारणाने झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.