ETV Bharat / state

भिवंडीत एका गोदामातून कंटेनरसह एक कोटींचा गुटखा जप्त

दापोडे येथील स्विद्दनाथ कंपाऊंडमध्ये असलेल्या एका गोदामामावर अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा जप्त करण्याता आला.

author img

By

Published : Jan 15, 2021, 7:51 PM IST

one-crore-gutka-seized-from-warehouse-with-container-in-bhiwandi
भिवंडीत एका गोदामातून कंटेनरसह एक कोटींचा गुटखा जप्त

ठाणे - भिवंडी तालुक्यातील दापोडे येथील स्विद्दनाथ कंपाऊंडमध्ये असलेल्या एका गोदामामावर अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा जप्त करण्याता आला. तसेच कंटेनर मालकाला अटक करण्यात आली.

एक कोटींचा गुटखा जप्त

जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत एक कोटी रुपये -

भिवंडी तालुक्यातील दापोडे येथे एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने पथकाने आज दुपारच्या सुमारास दापोडा ग्रामपंचायत हद्दीत स्विद्दनाथ कंपाऊंडमध्ये असलेल्या गोदामामध्ये उभ्या असलेल्या कंटेनरची तपासणी केली. यावेळी बूटांच्या खोक्यांमागे मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. यामध्ये माणिकचंद, दिलबाग, गोवा, राज विलास, हॉट या गुटख्याच्या तब्बल तीनशे गोणी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत एक कोटी रुपये असून कंटेनर मालकाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - कोणीही आरोप करावा आणि त्यावर निर्णय घ्यावा, अशी परिस्थिती नाही - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.